- डूबलं रे पिक सारं
- गेली पाण्यात कमाई
- सांग सांग रे सायबा
- कशी करु मी दिवाई !!
- झाली वरचढ आज
- फुशी फटाक्याची वात
- गड्या मातीमोल झाली
- माह्या पणतीची वात !!
- तेलं बेइमान झालं
- कापसाच्या त्या वातीले
- कसं वांझपण आलं
- खापराच्या पणतीले !!
- कसा लाऊ दिवा देवा
- घरी दारी मी देव्हारी
- असे लक्ष्मीचा निवास
- निच बेइमाना घरी !!
- दीप आरास पेटली
- भ्रष्ट दुराच्याऱ्या घरी
- कसा अंधारात झोपे
- बळीराजा कष्टकरी !!
- गोड दिवाई लागेना
- पेटली रे महागाई
- स्वरक्ताचेच व्यापारी
- आज झालेत कसाई !!
- कसा लावू तेलदिवा
- तेल चटणीवर न्हाई
- दिवे लावाया पाण्याचे
- येतील काय बाबा साई ?
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा.पोलीस उपनिरिक्षक (सेनि)
- अकोला (9923488556)