कवयित्री सौ.प्रीती वाडीभस्मे, तडस यांचा “शब्दफुले” कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी विचारमंचावर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध गझलकार संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते. ते म्हणाले-कवयित्री सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे यांनी गझलेत प्रगती करावी…वर्धा जिल्ह्याचा गझल काव्य वसा दीपमाला कुबडे पासून सुरू झालेला आहे…तो काव्य वसा गझलकारा सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे या पुढे चालवतील.
अध्यक्ष म्हणून प्राचार्य जयश्री कोटगिरवार होत्या. शब्दफुले हा कवितासंग्रह देखणा आहे..यात अनेक काव्यप्रकार कवयित्रीने समर्थपणे हाताळले आहेत. विशेष अतिथी म्हणून आचार्या विजयाताई मारोतकर नागपूर (पोरी जरा जपून) त्या म्हणाल्या स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे न्यावे. कवयित्री,लेखिका म्हणून अभिव्यक्त व्हावे.प्रमुख अतिथी म्हणून संजय ओरके सर उपस्थित होते.ते म्हणाले सौ.प्रीती यांनी आपली सकारात्मक चेतना वापरावी..बुध्द, आंबेडकर यांच्या मार्गाने वाटचाल करावी.मानवी मूल्याचा विचार आपल्या साहित्यातून प्रकट करावा. सौ.रत्ना मनवरे अमरावती यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा.अभय दांडेकर यांनी केले. कवयित्री सौ.प्रीती वाडीभस्मे यांनी आभार मनाले.
दुसरे सत्रात कवी संमेलन झाले.यात संजय इंगळे तिगावकर, संजय ओरके, विजयाताई मारोतकर, जयश्री कोटगिरवार, प्रशांत ढोले, महेन महाजन, प्रकाश जिंदे, रत्ना मनवरे, प्रा.अभय दांडेकर, प्रीती वाडीभस्मे इ.नी.आपल्या दमदार काव्यशैलीने रसिकांची मने जिंकली.पाऊस, एल्गार, आई इ.विषयावर कविंनी भाष्य केले.संजय इंगळे तिगावकर यांनी सावित्री ही कविता सादर केली.गझल सादर केली.कवी संमेलनाचे सुत्र संचालन युवा कवी प्रा.अभय दांडेकर यांनी केले.सर्व कवींचे सन्मानचिन्ह व बुके देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.बाबाराव तडस, प्रा.राकेश वाडीभस्मे, डॉ. सुरेश गुजर, झाडे सर यांनी मेहनत घेतली.