अमरावती :▪कवयित्री रत्ना यशवंत मनवरे यांच्या “मुक्त श्वासाच्या शोधात “या कवितासंग्रहाचे प्रकाशन अमरावती येथे देवी हेवन्स अपार्टमेंट, कठोरा नाका,पोटे पाटील चौक,अमरावती येथे संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवी,समीक्षक मा.प्रभाकर गंभीर बोलत होते.कवयित्री रत्ना मनवरे यांच्या स्त्रि जाणिवेच्या कविता आहेत.
कवयित्री यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने आपले विचार या कवितासंग्रहात व्यक्त केलेले आहे.कवयित्रीला कवितेची लय सापडली आहे.प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कवी मा.सुदामदादा सोनुले उपस्थित होते.स्त्रीस्वातंत्र्यावर भाष्य करणा-या कविता रत्ना यशवंत मनवरे यांच्या कविता आहेत.कवयित्री,संपादक सुनंदा बोदिले यांनी आपले मत व्यक्त केले.त्या म्हणाल्या ‘कवयित्री रत्ना मनवरे मॅडम यांनी भरपूर वाचन,लेखन, चिंतन करावे.व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची शक्ती रत्ना मनवरे यांच्या कवितेत आहेत.कवितेवर भाष्य करताना गझलकार प्रकाश बनसोड म्हणाले, रत्ना मनवरे यांनी अतिशय आत्मविश्वासपूर्ण व आशयघन कविता ‘मुक्त श्वासाच्या शोधात ‘लिहिलेल्या आहेत.डाॅ.नंदाताई तायवाडे यांनीही कवितासंग्रह वर भाष्य केले.प्रस्तावना रत्ना यशवंत मनवरे यांनी केली.
मनोगत उज्ज्वला माकोडे यांनी केले.आभार प्रदर्शन कवयित्री वंदना धाकडे यांनी केले.याप्रसंगी कवयित्री रत्ना मनवरे यांचा सत्कार पथदर्शक परिवार, वर्धा यांनी भेटवस्तू,शाल व बुके देवून करण्यात आला.पथदर्शक परिवारातील संजय ओरके सर,प्रकाश बनसोड, प्रशांत ढोले,प्रकाश जिंदे,प्रकाश कांबळे,डाँ.अरविंद पाटील ,सौ.पद्मा प्रशांत ढोले ,सुरेश मेश्राम, सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे इ.उपस्थित होते.सूत्रसंचालन कवी,समीक्षक प्रशांत ढोले यांनी केले.
दुसरे सत्र निमंत्रिताचे कविसंमेलनाचे होते.या कवीसंमेलनाचे अध्यक्ष मार्शल कवी संजय ओरके होते.अतिथी कवी म्हणून प्रीती वाडीभस्मे,निर्मल काळबांडे,सुनिल खोडके होते.बहारदार संचालन युवा गझलकार रोशन गजभिये यांनी केले.यात सहभागी कवी म्हणून डाॅ. नंदाताई तायवाडे प्रशांत ढोले,प्रकाश बनसोड, सुरेश भिवगडे,प्रकाश कांबळे,सुरेश मेश्राम, सुनंदा बोदिले,तेजस्विनी कांबळे,समाधान खिल्लारे,राजेश चौरपगार,डाॅ.अरविंद पाटील,प्रकाश जिंदे,गौतम ढोके,यथार्थ नागदिवे इ.कविंनी सामाजिक जाणिवेच्या कविता सादर केल्या.या कविसंमेलन याचे आभार यशवंत मनवरे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सिकंदर मनवरे,संजीवनी मनवरे,डाँ.विनोद ग॔भीर ,सौ.शारदा कठाणे, सागर कठाणे इ..नी अथक प्रयत्न केले.