- झाडांना काटे असू द्या कितीही
- फुलांना मात्र फुलावच लागतं..!
- गाडीत ओझं असू द्या कितीही
- बैलाला ते ओढावचं लागतं..!
- झाडावर हिरवीगार पाने
- असू द्या कितीही शेवटी
- गळून त्यांना खाली पडावच लागतं ..!
- मनापासून प्रेमासाठी सौंदर्य
- गरजेचं नसतच,
- दहा वेळा चेहरा धुण्यापेक्षा
- एक वेळ मन धुवाव लागतं..!
- निसर्गाचं एक नियम आहे
- दुःख देणाऱ्याला दुःख
- भोगावच लागतं..!
- करा तुम्ही कितीही कोणासाठी
- काही पण….
- त्यांच्यासाठी तुम्हाला शेवटी
- झुरावंच लागतं..!
- दुःख असो कितीही
- आपल्याला…..
- इतरांसाठी मात्र हसावच लागतं..!
- -सुरेश बा. राठोड
- (कलाशिक्षक)
- राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर
- जिल्हा.नागपूर
- 9765950144
—–