- बंडूकुमार धवणे
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसिलमधील करजगांव ग्रामपंचायतचा निकाल नुकताच जाहिर झाला असून शिवसेना गटाचे परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत वार्ड क्र. 1 मधून गजानन हरीचंद राठोड, सौ. कविता देवराव राठोड, सौ. शितल कृष्णाजी राठोड, हे तर वार्ड क्र. 2 मधून कृष्णाजी रायसिंग राठोड, रामेश्वर किसनराव चव्हाण, सौ. वंदना खेमराज राठोड आणि वार्ड क्र. 3 मधून संतोष रामरावजी चौधरी, सौ. विना श्रीकृष्ण ठाकरे, सौ.भाग्यश्री गोपाल गावंडे हे उमेदवार विजयी झाले होते .
दि.18/02/2021 रोजी झालेल्या निवडीत सरपंचपदी सौ. शितल कृष्णाजी राठोड यांची तर उपसरपंच पदी रामेश्वर चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी गजानन हरीचंद राठोड, सौ. कविता देवराव राठोड, कृष्णाजी रायसिंग राठोड, सौ. वंदना खेमराज राठोड, संतोष रामरावजी चौधरी, सौ. विना श्रीकृष्ण ठाकरे, सौ.भाग्यश्री गोपाल गावंडे निवड करण्यात आली. निवडीदरम्यान उपस्थिती नागरिकांनी सरपंचपदी विराजमान झालेल्या सौ. शीतल राठोड, उपसरपंचपदी रामेश्वर चव्हाण व सदस्य यांचे अभिनंदन केले आहे. या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून होते. परिवर्तन पॅनेलने 9 पैकी 9 जागा जिंकून प्रतिस्पर्धी पॅनेलकडून ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली. परिवर्तन पॅनेलने आपल्या यशाचे श्रेय पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड यांना दिले आहे.