- मनात दडल्या विकाराचे, संपत नाही युद्ध
- सांगण्यापुरता उरला फक्त.. ओठावरती बुद्ध..!
- खोटी नीती अन् व्यवहाराचे, चलन दिसे जोरात
- छापला नाही ते बरे झाले.. नोटावरती बुद्ध …!
- आंधळी श्रद्धा रोज घालते, भक्तीचे खतपाणी
- विवेकाचा बोधिवृक्ष तो..होत चालला वृद्ध…!
- प्रबोधनाचे काम दिसे पण आचरणाचे काय?
- आपणच आपली करत आलो.. फसवणूक ही शुद्ध…!
- नंदू वानखडे,
- मुंगळा जिल्हा वाशिम
- 9423650468