मुंबई: भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव असणार्या ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
दिग्दर्शक मोहन राजा, निर्माते डॉ. धनंजयन, गायिका हर्षदीप कौर, श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.
वडील व संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केले. वडिलांच्या निधनाच्या वेळी रेहमान फक्त नऊ वर्षांचे होते. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असे रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. वडिलांच्या निधनानंतर रेहमान यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रेहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. सुरुवातीच्या नकारानंतर आईच्या आग्रहास्तव रेहमान यांनी रोजा या चित्रपटाला संगीत दिले होते.
Related Stories
October 10, 2024