घ्यावं गोड करून
होणार नाही फायदा
एकच हट्ट धरून
कुटुंब उघडं पडेल
भाऊ अकाली मरुन
पावलं मात्र टाकावी
काळ वेळ हेरुन
आपण नाही पुरते
आज आपल्या घरून
समस्याच समस्या
टांगून आहेत वरुन
तुटे पर्यंत ताणू नका
कुटुंब जाईल झुरून
आधार कोणी देत नाही
नाव नेणार नाही तारून
जनतेचे हित पाहून
चला आता घरून
उरलीसुरली आपुलकी
बघा पक्की ठेवा धरून
एसटीच्या मित्रांनो
संप घ्या आवरुन
डबघाईचा संसार
आता घ्या सावरुन
पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१