आर्थिक वर्ष २0२१ मध्ये एलआयसीची एकूण गुंतवणूक पाच लाख कोटींची र्मयादा ओलांडेल. तसेच देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीसाठी ही सर्वकालिक उच्च असेल, अशी माहिती एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी दिली.
एका विशेष मुलाखतीत कुमार म्हणाले, की ३१ जानेवारी २0२१ पर्यंत एलआयसीने एकूण चार लाख ४४ हजार ९१९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी वार्षिक आधारावर २.२ ट्यांनी जास्त आहे. यामध्ये कर्ज आणि इक्विटी दोन्हीमध्ये गुंतवणुकीचा समावेश आहे. या गुंतवणुकीत इक्विटी गुंतवणुकीचा वाटा सुमारे ७२ हजार कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात एलआयसीने एकूण तीन लाख ५५ हजार ५५२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या वर्षात म्हजेच आर्थिक वर्ष २0२१ मध्ये एलआयसीची गुंतवणूक पाच लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते.
एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार आहे. एलआयसी देशातील सर्वांत मोठय़ा संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. इक्विटी आणि कर्ज बाजारात याची मोठी भूमिका आहे. एलआयसीकडून समभागांची खरेदी-विक्री निर्देशांकातील अस्थिरता दर्शवते. आर्थिक वर्ष २0२१ मध्ये एलआयसीने आपल्या इक्विटी गुंतवणुकीत मोठा नफा कमावला आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. एमआर कुमार म्हणाले, की वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात जेव्हा बाजारपेठेत अनिश्चतता होती, तेव्हा आम्ही मोठी खरेदी केली.
जुलैनंतर आम्ही विक्री सुरू केली. आतापर्यंत एलआयसीने समभागांच्या विक्रीतून ३४ हजार ९६८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष २0२0 मध्ये एलआयसीने ६१ हजार ५९0 कोटी रुपयांची इक्विटी खरेदी केली. म्हणजेच एलआयसीने या आर्थिक वर्षात दोन महिने शिल्लक असताना मागील वर्षाचा विक्रम पूर्ण केला आहे. गुंतवणूक करताना, एलआयसी एक विरोधाभासी रणनीती स्वीकारते, ज्यायोगे मार्केट तेजीत असते, तेव्हा बाजारात विक्री केली जाते. एलआयसी ग्राहक वस्तू, रिटेल, विमानचालन, भांडवली वस्तू आणि वाहन यासारख्या क्षेत्रांमध्ये शेअर्स खरेदी करते. एलआयसी इक्विटी आणि कर्ज दोन्हीमध्ये गुंतवणूक करते. त्याच्या निधीचा बराचसा भाग सरकारी सिक्युरिटीज आणि इतर हमी साधनांमध्ये गुंतवला जातो, असे त्यांनी सांगितले.
Related Stories
September 3, 2024