मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एमपीएससीच्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा एमपीएससीकडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली!
हा निर्णय घेतल्याचे या परिपत्रकावर नमूद करण्यात आले आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे देखील या पत्रकामध्ये म्हटले आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतीक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या १४ मार्च रोजी एमपीएससीची मार्च २0२0 मध्ये होणारी पूर्वपरीक्षा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील देण्यात आले होते. आता परीक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता उमेदवारांकडून याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणार्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा ज्वर काहीसा कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्या घेण्याचे ठरले. उमेदवारांनी तयारी देखील सुरू केली. ११ ऑक्टोबर तारीख ठरली. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबितच असल्यामुळे ती पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यासाठी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबरला होणार्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला होणार्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
Related Stories
October 10, 2024
October 9, 2024