- जिजाऊ समानतेची कास आहे
- स्वराज्याचा घेतला ध्यास आहे
- गोर गरीबाची माय ती भुकीचा तो
- स्वाभिमानी मिळालेला घास आहे
जिजाऊ हे नाव स्वातंत्र्याचे स्वराज्याचे उर्जायण क्रांतीच्या मशालीचे आहे.सोळाव्या शतकात. मनुस्मृतीवर प्रहार करणारी .एकमेव फिनिक्स पक्ष्यापरी. संकटावर स्वार होऊन .मुघलांच्या छातीवर पाय ठेवून .स्वराज स्थापन करण्याची निश्चयी भुमीका असलेली माँ जिजाऊ होय.
स्वराज्य निर्मितीचा वसा घेऊन तोच ध्यास स्वरांजाचा आत्मविश्वास निर्माण करणारी. ज्योत म्हणजे माँ..जिजाऊ होत .त्यांच्या चरणी प्रथमता हा मानाचा मुजरा….
अश्या थोर कन्येचा जन्म पराक्रमी सरदार लखुजीराव जाधव यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे झाला ..आई म्हाळसा बाई खूप धोरणी होत्या.जिजाऊ चा जन्म लखुजी जाधवांसाठी आनंद उत्सवापेक्षा कमी नव्हता .त्यांनी हत्तीवरून मुलगी झाली म्हणून संपूर्ण नगरात साखरपान वाटले होते .मुलीचा जन्मत्सोव मोठ्या आंनदाने त्यांनी साजरा केला होता . लहान पणापासून वडीलांच्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा ती ऐकत होती तसेच जिजाऊ ला सैनिकी शिक्षण दिले होते.युध्दाच्या रणनितीचे शिक्षण देऊन वेळ पडलीच तर युध्दभुमीवर जाण्यासाठी लागलेली घोडस्वारी कशी असावी असे युध्दभुमीवर चे शिक्षण जिजाऊ ला देण्यात आले होते .धन्य ते लखुजी जाधव त्यांनी जिजाऊ ला पोथी पुराणाच्या शास्त्राच्या बाहेर काढले .वडील असावे तर असे.
वयाच्या तेराव्या वर्षी जिजाऊ चा विवाह वेरूळ येथील मालोजीराव भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे यांच्याशी दौलताबाद किल्ल्या मध्ये झाला तेव्हा त्यांच्या.विवाहात मुर्तिजा निजामशाह हा उपस्थित होता . हीच मुलगी महाराष्ट्राची राजमाता होईल हे जणू लखुजी जाधवांनी ओळखले हे माहिती असल्याप्रमाणे आपल्या मुलीला राजकीय डावपेच .युध्द निती , चे शिक्षण दिले संसार संभाळून ही स्वराज्य निर्माण करण्याची स्वंयप्रेरणा ही जिजाऊ असेल अशी त्यांना त्यावेळी चाहुलही नसेल ..पण लखूजीजाधवांनी मुलासारखेच मुलीलाही शिक्षण दिले होते .मुलीतील सुक्ष्म गुण जाणुन योग्य तसे घडविले .
जिजाऊ ला सहा संतान झाले त्यामध्ये दोन मूली व दोन मुले गेले होते आणि संभाजी आणि शिवाजी राहिले..
भोसले व जाधवांचे वैर झाले काही वर्षात जाधव व शहाजी भोसले यांच्यात बेवनाव निर्माण झाला .कारण असे की एकदा एक पिसाळलेल्या हत्ती पकडण्यास २ पथके तयार केली .जाधवांचे नेतृत्व दत्ताजी जाधव .लखूजी जाधव यांचा मुलगा म्हणजे जिजाऊचा भाऊ करत होते.दुसरे पथक शरफोजी भोसले शहाजीराव यांचे बंधू करत होते .यात दोघांचे भांडण झाले संभाजी भोसल्यांनी दत्ताजी भोसल्यास ठार केले हे लखूजी जाधवास समजताच त्यांनी रागाने शहाजीचे भाऊ संभाजी भोसले यांना ठार केले . हे शहाजीला. समजताच ते समशेर घेऊन सासर् यावर चालून गेले.या खटपटीत जांधवांचा वार शहाजीच्या दंडावर बसला .या प्रसंगानंतर त्या आपल्या पतीशी एकनिष्ठ राहिल्या व माहेरशी सबंध तोडले नात्यांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात जिजाउनी कसल्याही प्रकारचा कसूर घडू दिला नाही चोख पणे संसार संभाळला पण माहेराची कधी आठवण काढली नाही. अश्या निश्चयी बाण्याच्या होत्या जिजाऊ.
.जिजाऊने शिवाजीला घडविले आणि स्वराज्य चे तोरण बांधले .त्यांनी स्वंताच्या युक्ती .शक्ती .सिध्दीच्या बळावर त्यांनी मावळ्यांची ची फौज तयार केली.त्यामध्ये तानाजी मालसुरे बाजीप्रभू ,जीवामाहार सिहनाक रायनाक अश्या लढावू बहाद्दराची एकनिष्ठ फौज पाहून. जिजाऊ चा उर भरून आला होता .अश्या अनेक स्वंराज्य निर्मिती साठी फौजा निर्माण झाल्या.त्याच बरोबर महीलांना स्वंयप्रेरणा देऊन भवानी पाटील सारख्या योध्दा घडविल्या याच भवानी पाटील ने शिवबाला रणांगणाचे शिक्षण दिले हा इतिहास आपल्या पर्यत येऊ दिला नाही .हे या भारताचे दुदैव आहे ..शिवाजीने जेव्हा रणांगणात लढाई चे शौर्य दाखविले ..ते पाहुन जिजाऊ थक्क झाल्या .आणि हर्षभरीत झाल्या आणि म्हणाल्या भवानी पाटीला
भवानी पाटील ज्या ज्या वेळी शिवबाचे नाव घेतल्या जाईल त्या त्या वेळी भवानीचा जय जय कार होईल.म्हणुन ही भवानी पाटील आज ही भवानी नावात जींवत आहे ..पण दुदैवाने ही भवानी पाटील नसून एक देवी म्हणून पाहतो.त्यामुळे मनाला वेदना होतात.याच भवानी पाटील ने शिवाजीला तलवार दिली ती आज ही इतिहासक दस्तावेज म्हणून सुरक्षित आहे..भवानी नाव ठेवले आणी पाटील काढले .तिथे देवीची मुर्ति बसवून या ब्राह्मणी विचार टाळूवरचे आजपर्यंत लोणी खात आहे .हे थांबले पाहीजे तेव्हाच जिजाऊ ला ही खरी आदरांजली ठरेल
माणसाने एवढेही अंध होऊ नये…
अश्या महीलांच्या फौज त्यावेळी जिजाऊ ने केल्या तयार होत्या.म्हणून च जिजाऊ हे महाकाव्य एका लेखात मावने शक्य नाही…तरी काही आठवणी लिहण्याचा प्रयत्न करते…जिजाऊ नेहमी म्हणत सासर् यांनी चाकरी केली ,पतीने चाकरी ,पण माझा मुलगा चाकरी करणार नाही .माझा शिवबा स्वंराज्य निर्माण करीन .असे ठाम पणे सांगणारी .तीच जिजाऊ घोडेस्वार करत हातात तलवार घेऊन रंणागणांवर जाण्यासाठी लढावू बाणा अंगावर चढवणारी जिजाऊ होती .शौर्याची गाथा होती .तलवारीची धार होती .स्वराज्याचा आकार होती माँ जिजाऊ..शिवनेरी गड सोडल्यांनंतर बाल शिवाजीला घेऊन पुण्यात आल्या .तेव्हा मुघलांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले होते.महसूल गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल हाल होते.तेव्हा पडीत पडलेल्या.जमीनीवर सोन्याचा नागंर फिरवून जमीनी कसल्या .आणि गोरबरींबाना न्याय दिला .आणि काही दिवसांनी पिक दिसू लागले .ते गाव होते खेडेबारे
बाल शिवाजी आणि जिजाऊला शहाजीनी पुण्याच्या जवळ खेडेबारे या गावाची निवड करून त्या गावात ठेवले होते .आज हे खेडे खेडशिवापूर या नावाने ओळखले जाते.
शहाजी राजे कर्नाटक मध्ये असताना अनेक प्रदेश जिंकले .विजापूर येथे प्रचंड खडंणी घेऊन आले.व बंगलोर ही जिकले म्हणून अदिलशाहा या पराक्रमाने खूपच खुष झाला तेव्हा शहाजी राजांना बंगलोर हे शहर जाहागीर मिळाली.
तिकडे कर्नाटकात शहाजी राज्य करत असताना इकडे जिजाऊ पुण्याचा कारभार संभाळत होत्या ,आता शहाजीचे कर्नाटकात चांगलेच प्रस्थान झाले ।त्यांनी जिजाऊ आणि बाळ शिवाजीला कर्नाटकात बोलावून घेतले ,शहाजीराज्याजवळ संभाजी राजे होते.सर्व कुटुंब कपाली येथे वास्तवाला होती
शिवबाला शहाजींनी राजकीय डावपेच शिकवले . शहाजींना वाटायचे दोन मुलांनी माझ्यापेक्षा ही शुर वीर पराक्रमी व्हावे असे वाटत होते.
विजापूर कराचे काही लोकांनी कान भरले की शहाजी हिंदू राज्यांना मदत करतो.यावरून विजापूरचा सेनापती मुस्ताफाखाने शहाजींना अटक केली .हे वृत शिवाजी आणि संभाजींना समजताच ते फरीदखान फत्तेखानाच्या सोबत लढाईत उतरले .ही लढाई लढण्याची शिबवाची पहीलीच वेळ होती ।तरी शिवाजी जिंकले होते..शिवाजीने यूध्द जरी जिंकले तरी शहाजी हे अटकेतुन मुक्त व्हायला पाहिजे असे मनोमन जिजाऊ ला वाटत होते.विजापूरचा शत्रु दक्षिणेतील मुघलाचा सुभेरार मुरादशी सख्य केले .आणि शिवाजी संभाजी दोन्ही पराक्रमी मुलांना घेऊन विजापूरचा अदिलशाहा वर चालून गेले ..आता आदिलशाहाला संकटाची चाहुल लागली त्यातुन त्याने सुचवले कि किल्ले परत करा..पण शिवाजी कोंढाणा देण्यास तयार नव्हते. तेव्हाजिजाऊ ने सोनोपंत डबीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवराय तयार झाले..
अशा स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांचे २३ जानेवारी १६ ४४ मध्ये निधन झाले कर्नाटकात शिकारी साठी ते घोडावरून जात असताना हातात भला मोठा भाला होता .पण घोड्यांचा पाय रान वेलीत अडकल्यामुळे ते दुरवर फेकल्या गेले त्यातच त्यांचा मृत्यू झाला..
तेव्हा जिजाऊ वर आभाळ कोसळले .त्यावेळी पतीच्या सोबत सती जाण्याची परपंरा होती .ती जिजाऊ ने नकारली . त्यांना वाटायचे पित्याने पुत्राचा पराक्रम पाहायला हवा होता.स्वराज्य निर्माण करताना लढायाचे होते..पण त्यांच्या मागे हे माझे कर्तृत्व आहे म्हणून सती जाणार नाही. या मातीवरची मने ओरडून विचारतात की माते आम्हाला केव्हा मुक्त करते .त्यांचे दुख आणि गुलामीची पिळवणूक मला पाहावत नाही. ज़ोवर माझा श्वास चालेल तोवर या रयतेला हे जीवन मी समर्पित करीत आहे अशी महाराष्ट्राची लेक होती जिजाऊ.. समानतेची .न्यायाची ज्योत होती बुध्दाचे तत्त्वज्ञान आत्मसात करणारी ती बलाढ्य स्त्री होती …कारण त्यांनी केव्हाच अशा अनिष्ट बंधनाचा पराभव केला होता.त्यांनी तत्कालीन रूढीपरपंरा मोडल्या होत्या जश्या़ की स्त्रीने राज्यकारभार करू नये.संपत्ती गोळा करू नये .सोन्याने आपली तुला करून घेऊ नये.हे सर्व त्यांनी नाकारून माणुसकीने माणुस जोडण्याचे कार्य जिजाऊन केले होते..म्हणून स्वंराज्य त्यांना पाहाता आले..
अश्या थोर जिजाऊनी शिवरायाचा राज्यभिषेक ६ जून १६ ७४ ला डोळे भरून पाहीला ..आणि काही दिवसातच पाचड येथील राजवाड्यात १७ जून १६ ७४ मध्यरात्रीला म्हणजेच तीन ते चारची दिवस निघण्याची बहुदा वेळ होती .तेव्हा या राजमातेला काळाने झडप घालून शिवरायांना सोडून ही माय निघून गेली होती.तेव्हा शिवराय जिजाऊ च्या पायाजवळ बसून रडत होते
अशी जिजाऊ पुन्हा होणे नाही .आता फक्त त्यांची स्मृती आणि स्मृतीतून मिळणारी प्रेरणा या वास्तवाचा स्विकार करून स्वराज्य निर्मितीच्या मातेस अंखड अभिवादन
अश्या थोर मातेस विनम्र अभिवादन आणि शत शत प्रमाण…
- सुनीता इंगळे
- मुर्तिजापूर
- 72 18 69 43 05