नांदेड : आर्चीची एन्ट्री म्हटली की नागरिक सैराट होणार हे नक्की. मात्र कोरोनाच्या काळात हाच प्रकार सहा जणांना महागात पडला आहे. सैराट चित्रपटानंतर आर्ची-परश्याची जोडी लोकांनी डोक्यावर उचलून घेतली. आजही ही जोडी कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचे कळते तरी मोठी गर्दी जमा होते. मात्र चाहत्यांचे हे वेड कोरोनाला पूरक ठरू शकते, याचा विसर पडल्याचे दिसत आहे. कोविड नियमांचे पालन न केल्याने नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यातील सारखणी येथे लेंगी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लेंगी महोत्सवाला सैराट फ्रेम आचीर्ला म्हणजेच रिंकू राजगुरू हिला बोलावल्यात आले होते. १६ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आर्चीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मास्कचा वापर केला नव्हता, असं चित्र आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related Stories
October 10, 2024