चांदूर बाजार: स्थानिक गो. सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथे संस्थाध्यक्ष दादासाहेब टोम्पे यांच्या ८० व्या वर्षात पदार्पण निमित्य राष्ट्रीय सेवा योजना आयोजित आरोग्य निदान व तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भास्करराव टोम्पे, सचिव होते तर म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पवन अग्रवाल (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. सिकंदर अडवानी (न्युरोलॉजिस्ट) डॉ. आनंद काकानी (न्युरोसर्जन), डॉ. प्रणित काकडे (नेफरोलॉजिस्ट), डॉ. अक्षय चांदुरकर (नुरोसायकिअट्री) सर्व रेडीएन्ट सुपरस्पेसियालिटी हॉस्पिटल, अमरावती लाभले होते आणि श्री. राजेशजी ढगे, प्रा. डॉ विजय टोपे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके व प्राचार्य डॉ. संजय शेजव मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात संस्थापक अध्यक्ष गोविंदराव टोम्पे यांच्या पुतळयाच्या हारार्पण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. विजय टोम्पे यांनी देत डॉक्टरांच्या कार्याचे महत्व कोरोना काळात प्रत्येक माणसाला कळल्याची भावना व्यक्त केली.
सदर आरोग्य निदान व तपासणी शिबिराची सुरवात सर्व डॉक्टरांच्या हृदय विकार, हार्ट अटॅक, स्ट्रोक पॅरालीसीस व लकवा यांची कारणे आणि सावधगिरी या विषयावर मार्गदर्शनाने झाली. या प्रसंगी डॉ. आनंद काकाणी यांनी स्वर्गीय गोविंदराव दादा टोम्पे यांनी ग्रामीण भागातील सर्व गोरगरिबांच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या भावी शिक्षण संस्थेची स्थापना मोठ्या उदात्त हेतूने केले आहे असे मत व्यक्त करत रेडिएन्ट हॉस्पिटला नवीन अद्यावत आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाचे सोय उपलब्ध असून तज्ञ डॉक्टरांनी अनेक रुग्णाचे प्राण वाचवले असल्याचे अनेक दाखले दिलेत. डॉ. सिकंदर अडवाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात आजार होण्या अगोदर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संपूर्ण जगात प्रत्येक चार सेकंदाला एकाला व्यक्तीला स्ट्रोक येत असतो. अचानक हात पाय जड पडणे, अचानक कमी दिसते, अचानक बेहोष होणे अशी लक्षणे स्ट्रोकची असतात पण लगेच वेळीत आपण त्याची लक्षणे व धोका लक्षात घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला