- आयुष्य म्हणजे आगगाडी
- आशेच्या रुळावर धावते
- स्टेशन चा सहारा घेत, शेवटी
- निराशेच्या स्टेशनवर उतरवते !!
- आयुष्य जणू डिझेल इंजिन
- संपले की भराच भरा
- शेवटपर्यंत आशा अपेक्षा
- शेवटी भडका उडले खरा !!
- डब्याला डबा जोडत चला
- बॅलन्स नीट सांभाळायचा
- एक डबा निसटला जरी
- आगगाडीला झटका लागायचा !!
- प्रवासी जणू नातीगोती
- आयुष्याची ती गुरूकिल्ली
- गाडीत बसूनच राहिले तरी
- उडवता नाही येत खिल्ली !!
- सुख दुःख सारे झेलावे
- थंडी ऊन असो पाऊस
- धावत सतत राहायचे
- हेच कर्तव्य करतो माणूस !!
- आगगाडी ची शिटी म्हणजे
- आई-वडील, बायको मुले
- भोवताली घालून रिंगण, जणू
- जपतो ओंजळीतील फुले !!
- आयुष्य किती सुंदर आहे
- समजावे त्याचे महत्त्व
- जीवन आनंदी जगावे हेच
- आयुष्याचे सत्व आणि तत्व !!
- -हर्षा वाघमारे
- नागपूर
(Images Credit : Pintrest)