अमरावती : अमरावतीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. 9 डिसेंबर रोजी सुझकी मोटार, सुझुकी मोटर गुजरात प्रा.लि. यांच्या तर्फे रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या भरती मेळाव्याला अमरावती जिल्ह्यातून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवार 174 उपस्थित होते. या उमेदवारांपैकी 89 मुलांची सुझुकी मोटर कंपनीत निवड झाली आहे. ही संस्थेसाठी तसेच जिल्ह्यासाठी अभिनंदनीय बाब ठरली आहे.
या रोजगार भरती मेळाव्याला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, आय.टी.आय.चे प्राचार्य श्रीमती देशमुख मँडम तसेच बी.टी.आर.आय.चे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती गूढे मँडम, कांबळे सर, पन्नासे मँडम,आयटीआय निदेशक उपस्थित होते. तसेच श्री. येते व श्री. शेगोकार यांनी कपंनीत निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. निवड झालेल्या सर्व 89 उमेदवारांना घेऊन जाण्यासाठी सुझूकी कंपनीतर्फे मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व आय.टी.आय. प्राचार्यांचे हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.
Related Stories
December 7, 2023