- आम्ही सारे लोक शिकले आहोत,
- तज्ञ आहोत, सुधारले आहोत,
- पुढारले आहोत, लढवय्ये आहोत ,
- भावनीक आहोत, उदार आहोत ,
- अन्यायाविरोधात लढतो,
- आंदोलने करतो, स्वाभिमानाने जगतो
- इतरांनाही प्रवाहात सामावून घेतो
- बाबासाहेबांच्या त्या बोटाच्या दिशेने चालतो
- तरीही पाऊलं संसदेत का जात नाहीत ?
- सभेला गर्दीही असते
- पण विजयात मात्र बदलत नाही !
- तेव्हा वाटतं …
- आम्ही ध्येयाने झपाटलेली माणसं
- सर्वांनाच डोक्यावर घेतो
- पण एकच गोष्ट डोक्यात घेत नाही
- जेव्हा सगळेच विरोधात असतात तेव्हा
- आम्ही सारे लोक मात्र एकत्र होत नाहीत
- आम्ही एकदा नवं गणित मांडलं पाहिजे
- आम्ही सारे लोक एक झालो पाहिजे
- हातचा एक धरून लढलो पाहिजे !
- -अरुण विघ्ने
- रेखाटन सौजन्य : संजय ओरके सर
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–