अमरावती : येथील उपेक्षित समाज महासंघाच्या वतीने यावर्षी दिल्या जाणारा राज्यस्तरीय म. फुले समाज प्रबोधन हा महत्वपूर्ण पुरस्कार समाज सेवक, लेखक, साहित्यिक ऍड. प्रभाकर वानखडे यांना आमदार रवी राणा यांचे हस्ते दिनांक 17 ऑगस्ट रोजी थाटात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. श्रीकृष्ण बनसोड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जन अधिकार पार्टी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष इंजि. वासुदेवराव चौधरी, सत्कारमूर्ती ऍड. प्रभाकरराव वानखडे, सौ. वंदना प्रभाकर वानखडे, क्रांती ज्योती ब्रिगेड चे प्रदेश समन्व्यक ओमप्रकाश अंबाडकर, समाज सेविका रजिया सुलताना, काँग्रेस पार्टी व उपेक्षित समाज
महासंघाच्या महानगर अध्यक्ष देवयानी कुर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख, आय. ए. एस. अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, समता परिषदेचे प्रदेश सचिव तथा माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर, प्रदेश सदस्य ऍड. बाबुराव बेलसरे , छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापिठाचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख, माजी तुरुंग अधिकारी कमलाकर घोंगडे उपस्थित होते.
फुले सावित्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रा. अरुण बाबाराव बुंदीले यांनी स्वागत गीत सादर केले.स्वागताध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे यांनी प्रास्तविक भाषणातून सत्कारमूर्ती ऍड. प्रभाकर वानखडे यांच्या प्रबोधन कार्याची माहिती दिली.
ऍड. प्रभाकर वानखडे सारखे समाज सेवक प्रत्येक समाजात असल्यास समाज प्रबोधन व परिवर्तन होऊ शकते असे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी मनोगत व्यक्त करतांना केले.तसेच त्यांनी ऍड. प्रभाकर वानखडे यांच्या मातोश्री अन्नपूर्णा वानखडे यांचा शाल व पुष्पगुष्य देऊन सत्कार केला.
बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व ऍड. प्रभाकर वानखडे गेल्या 20 वर्षापासून करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या वाढदिवशी विविध सामाजिक राजकीय संस्था, संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित झाल्यामुळे आज त्यांचा नागरी सत्कार झाला असे मत प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी अध्यक्षीय मनोगत मधून व्यक्त केले.
ऍड. प्रभाकर वानखडे हे बहूआयामी व्यक्तीमत्व आहेत. ते फुले,शाहू, आंबेडकर व ओबीसी चळवळीचे सातत्याने प्रबोधन करतात.त्यांचा आदर्श बहुजन समाजाने घ्यावा असे विचार जन अधिकार पार्टी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष इंजि. वासुदेवराव चौधरी यांनी शुभेच्छा देतांना व्यक्त केले.ओबीसी चळवळ गतिमान करण्याचे नेतृत्व व समाजाभिमुख कार्य निस्वार्थ वृत्तीने ऍड. वानखडे आजतगायत करीत असल्याचे मत डॉ. गणेश खारकर यांनी व्यक्त केले.
सदर सोहळ्या करीता सर्व जाती, धर्म, पंथ सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी तसेच भाजपा, शिवसेना, काँगेस व ओबीसी विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान,वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती.उपस्थितीत मान्यवरांनी सत्कार मूर्ती ऍड. प्रभाकर वानखडे यांचा सत्कार करून अभिष्टचिंतन केले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, पुष्पगुच्छ, म. फुलेचे समग्र ग्रंथ असे होते.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा. डॉ. उज्वला मेहरे व कवयत्री प्रा. शीतल राऊत यांनी केले. आभार महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष स्मिता घाटोळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राऊत परिवार यांनी अथक परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.