- * २ लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया; ऊईके कुटुंबाला मिळाला दिलासा
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
मोर्शी (प्रतिनिधी) : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत असून रुग्णसेवेला प्राधान्य देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम आमदार देवेंद्र भुयार करत आहे.
मोर्शी तालुक्यातील पाळा येथील प्रणव आनंद उईके वय १६ वर्ष यांची २ लक्ष रुपयांची पायाच्या हाडाची शात्रक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांचे माध्यमातून मुंबई येथे एस आर सी सी हॉस्पिटल हाजी आली रुग्णालय मुंबई येथे मोफत करण्यात आली.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या रुग्णसेवेमुळे प्रणव आनंद उईके यांना मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे उईके कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे उईके परिवाराने आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, रुग्णसेवक पंकज ठाकरे, यांचे आभार मानले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–