मोर्शी : मोर्शी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकरीता घरकुल योजने संदर्भात मोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या घरकुलसंदर्भात प्रपत्र ड यादीतील अपात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे व काही तांत्रिक अडचणीमुळे सदर घरकुलांच्या कामाची गती थांबलेली आहे. ही थांबलेली कामे पुन्हा सुरू व्हावे व त्याला अधिक गती मिळावी याकरिता आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मोर्शी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांचे “प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रपत्र ड यादीतील एकूण १३५४२ लाभार्थ्यांपैकी १०४६३ लाभार्थ्यांची घरकुल ड यादी मंजुर करण्यात आली आहे. त्यापैकी जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांचे १४ कारणांनी अपात्र ठरविलेले लाभार्थी पात्र करण्यासाठी आढावा बैठकीमध्ये चर्चा करून मोर्शी तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले या कामामध्ये कुणीही दिरंगाई केल्यास त्याला माफ केले जाणार नसल्याचा ईशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिला. २०२२ पर्यंत सर्व गरजूंना घरे मिळावीत म्हणून माझा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, वरुड तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख ,सहाय्यक प्रकल्प संचालक संजय जवंजाळ, गट विकास अधिकारी रवींद्र पवार, तहसीलदार श्रीकृष्ण ठाकरे, पंचयात समिती सदस्य यादवराव चोपडे, सुनील कडू, विस्तार अधिकारी भिवगडे, सुपले, यांच्यासह मोर्शी तालुक्यातील सर्व सरपंच सचिव यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
—–