वरुड : वरुड तालुक्यातील शे घाट येथील केंद्रीय रिझर्व पोलीस बलातून सेवानिवृत्त झालेले उमेश हजारे यांचा आमदार देवेंद्र भुयार यांनी सत्कार करण्यात आला. केंद्रीय रिझर्व पोलीस बलातुन (CRPF) सेवानिवृत्त झालेले शेंदुर्जना घाट येथील उमेश हजारे यांनी २० वर्ष ६ महिने CRPF मध्ये सेवा दिली असून उमेश हजारे यांनी झारखंड, छत्तीसगड, जम्मू काश्मीर ,पश्चिम बंगाल, मणीपूर, उडीसा, मध्य प्रदेश, मिझोरम, अयोध्या, गुजरात ई. ठिकाणी सेवा दिलेली आहे. उल्लेखनीय म्हणजे छत्तीसगड येथे २०१० ला माओवाद्याकडून झालेल्या हल्य्यात ७६ CRPF चे जवान शाहिद झाले त्या ठिकाणी सुद्धा उमेश हजारे यांनी सेवा दिलेली आहे आणि त्या हल्ल्यात थोडक्यात बचावले.
जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करणारे सेवा निवृत्त सैनिक उमेश हजारे यांचा सत्कार करतेवेळी संदीप खडसे, संजय डफरे,गौरव गणोरकर,आनन्द देशमुख, नितीन श्रीराव, अरुण डोईजोड, लुकेश वंजारी, नितेश वंजारी, प्रशांत भंडारे, सतीश काळे नवनीत गायकी, नामदेवराव कलंबे, रवीभाऊ वंजारी, संजय थेटे आदी उपस्थित होते
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023