बीड : पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण अत्यंत व्यथित झाले आहेत. पूजाच्या आत्महत्येवरून विनाकारण आमची बदनामी केली जात आहे. आमची ही बदनामी त्वरीत थांबवा. आम्हाला चार दिवस जगू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
लहू चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणात आमची बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहेत. आता पूर्ण कपडे काढू नका. कृपा करा, आता आणखी बदनामी करू नका, अशी हातजोडून विनंती करतानाच तुम्ही आणखी बदनामी केली तर मी आत्महत्या करेन, असा आक्रोशच त्यांनी केला.
माझी मुलगी खूप चांगली होती. लोकं उगाच तिची बगनामी करत आहेत. राजकारणाच्या दबावाखाली मी बोलत आहे का असेही विचारले जात आहे. पण माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे लहू चव्हाण यांनी सांगितले. मी पुण्याला गेलो होतो. तिथे विचारपूस केली. त्यावेळी पूजा गॅलरीत बसली होती. दीड वाजता ती खाली पडली. चक्कर येत असल्याचे ती सांगत होती, असे तिच्यासोबत राहणार्या तिच्या मित्राने सांगितले. सांगा आता मी कुणावर आरोप करू? असा सवाल त्यांनी केला.
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023