राळेगाव : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचे मॅसेज शेतकर्यांना आले. त्यानंतर शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण केले परंतु महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा न झाल्याने शेतकर्यांना नवीन कजार्पासून वंचित राहावे लागत आहे.
महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत आजतागायत अनेक शेतकर्यांना कर्जमाफी झाली अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफी झाल्याचे मॅसेज काही शेतकर्यांना आले त्यानंतर शेतकर्यांनी सेतू तसेच इतर केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण केले. आधार प्रमाणीकरण करून सुद्धा एक महिन्याच्यावर कालावधी उलटला असतानाही अजूनही शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याने संबंधित शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारतात, पण बँक अधिकारी रक्कम खात्यात जमा व्हायचीच आहे असे उत्तर देतात. रक्कम जमा झाल्याचे मॅसेज तुम्हाला सहकार विभागाकडूनच येईल त्यानंतर तुम्ही बँकेत या असे अधिकारी सांगतात तर दुसरीकडे सहकार विभागाकडून शेतकर्यांना अजूनपयर्ंत कुठलेही मॅसेज आले नाही कर्जमाफीची रक्कम शासन संबंधित शेतकर्याच्या कर्ज खात्यात जमा करते त्यानंतर बँक शेतकर्यांना नवीन कर्ज दिल्या जाते परंतु शासनाने कर्जमाफीची रक्कम कर्जखात्यात जमा न केल्याने संबंधित शेतकर्याला नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे यापूर्वी आधार प्रमाणीकरण झाले की सात दिवसाच्या आत कर्जमाफीची रक्कम शेतकर्याच्या खात्यात जमा व्हायची परंतु आज महिना उलटूनही रक्कम खात्यात जमा झाली नाही.