- आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते २७८० आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप !
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांना खावटी अनुदान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील किराणामाल किटवाटप आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते गणेशपुर, अर्धमानी, दाहसुर, पिंपरी, पिंपळखुटा लहान, तळणी, पिंपळखुटा मोठा, पार्डी, दुर्गवाडा येथून वाटप करण्यास सुरवात झाली आहे. मोर्शी तालुक्यातील लाभार्थी कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत असून, मोर्शी तालुक्यातील २ हजार ७८० लाभार्थ्यांना किटवाटप करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के म्हणजे दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तर उर्वरित ५० टक्के अंतर्गत धान्य किराणा स्वरुपात खावटी कीट वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ योग्य व गरजू आदिवासींपर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सन २०१० ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अंबाडा, आष्टोली, बेलोना, भाईपुर, भिवकुंडी, चिखल सावंगी, चिंचोली गवळी, दहसुर, धामणगाव, धानोरा, दुर्गवाडा, गनेशपूर, घोडदेव, हिवरखेड, खानापूर खेड, खोपडा, लाखारा, मायवाडी, मोर्शी, नसितपूर, निंभी, पाळा, पार्डी, पिंपळखुटा लहान, पिंपळखुटा मोठा, पिंपरी, रिद्धपुर, सायवाडा, शिंभोरा, तळणी, तरोडा, उदखेड, उमरखेड, वऱ्हा डोंगर यावली, येरला, यासह मोर्शी तालुक्यातील २७८० आदिवासी बांधवांना या योजनेच्या माध्यमातून रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष हितेश साबळे, शहर युवक अध्यक्ष अंकुश घारड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, विलास ठाकरे, पिंपळखुटा येथील सरपंच शुभांगी मोगरकर, तळणी येथील सरपंच संदीप भलावी, उप सरपंच अनिल काळे, गणेशपुर येथील सरपंच विजय सितकारे, उपसरपंच राजू धुर्वे, प्रकाश निकम, सागर उघडे, शुभम तिडके, ऋषीकेश राऊत, प्रफुल खडसे यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.