अखंड प्रवासासाठी वाट होत असते कधी सरळ,कधी वाकडी,रुंद, निरुंद,प्रकाशमय,काळोखी थांबा पुढे जा,खाच खळगे यातूनच कदाचित त्यांना वरिष्ठांनी त्याकाळी शिकवलं असेल.त्यांचा स्वभाव म्हणजे…..चालावं कसं गर्वान,शालिंतेन अन् विश्वासान .जीवनाच्या प्रवासात धावायचं, थकायच, थांबायचं पण क्षणभर पुन्हा नव्या दमाने समोर आणि समोरच चालायचं.अनेक अडचणी पण येतील कधी पाऊस कधी उन..पण डोक्यावर ठेवा कर्तुत्वाची छत्री..शिंतोडे उडतील, ओलेही होतील,पुर येतील पण ताकदीनं बाहेर पडायचं हेच वाक्य त्यांचं…
आयुष्याचा प्रवाह अतिशय विलक्षण,अदभुत असतो पण या प्रवाहाविरुद्ध दिशेने पोहून काही स्त्रिया उत्तुंग यश संपादन करतात..शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करून भिवापूर जिल्हा नागपूर येथे राष्ट्रीय विद्यालयाचा पाया रोवणाऱ्या,खडतर जीवन जगून आज सर्वोच्च शिखरावर विराजमान असणाऱ्या संस्थेच्या सचिव श्रीमती लतिफा कुरेशी ज्यांना परिसरातील सर्वच नागरिक शेख मॅडम….म्हणून ओळखतात..मॅडम च्या जन्म दिनी लीहण्याच भाग्य मला मिळालं खरंच मी स्वतःला भाग्यशाली समजतो मॅडम चा इतिहास सर्वानाच लाजवेल असा आहे…
अश्या मॅडम चा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा या गावी गरीब शेतकरी मुस्लिम कुटुंबात 12 सप्टेंबर 1949 रोजी झाला. मॅडम ला पाच भावंड. शिक्षणाची ओढ आणि आवड लहानपणापासूनच होती परंतु समाजाचे बंधन, वरिष्ठ भावाकडून शिक्षणाचा विरोध..परंतु वडीलाकडून पाठिंबा…प्रार्थमिक आणि विद्यालयीन शिक्षणासाठी मॅडम ला इतरत्र जाऊन शिकावं लागलं. अशा कठीण परिस्थितीत मॅडम घरी अपराध केल्यासारख लपून अभ्यास करून दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या खर पाहता मॅडम ची खरी जीवनाची सुरुवात तेथूनच झाली असं म्हटल्यास हरकत नाही….शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर घरी बसण्यापेक्षा 1972 ला नागपूरला उर्दू श्यालेमध्ये शिक्षकाची नौकरी पत्करली अन् मन लाऊन अध्यापनाचे कार्य केले.. त्याच काळात मॅडम नी उर्दू मध्ये डी. एड केले..
.
भिवापुरला एका शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले अन् मूळ नागपूर येथील रहिवाशी असलेले गुलाम मोहिद्दिन जहिरुद्दीन ( शेख बाबूजी)यांच्या सोबत 1974 ला विवाह बंधनात अडकल्या सासर कडील मंडळी पारंपरिक पद्धतीचे होते त्यांचा मॅडमला नौकरी करण्यास विरोध होता आपल्या परिवारातील सून बाहेर नौकरी करावी हे त्यांना मान्य नव्हते . शेवटी नागपूर सोडून मॅडम आपल्या पतीला म्हणजे बाबुजीला घेऊन भिवापुरला येऊन भाड्याच्या खोलीत आपला संसार मांडला त्या वेळी बाबूजींच्या पगार अत्यल्प होता त्या पगारात घर चालवणे कठीण होते तेवढ्यात मॅडम नी शिवणकाम करून बाबुजीला हातभार लावण्याचे कार्य केले. अहोरात्र काम करत असताना बाबुजीची साथ मॅडमला अन् मॅडमची साथ बाबुजीला..त्याचवर्षी मॅडम च्या घरी 1976एका कन्येने जन्म घेतला त्यांचे नाव शबाना ठेवले..अन् 1979 ला एका सुपुत्राने जन्म घेतला त्यांचे नाव इमरान असे ठेवले..तेच लहानपणीचे इमरान म्हणजे (आजच्या घडीला यशस्वी पणे राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे धुरा सांभाळणारे कर्तव्यनिष्ठ प्राचार्य श्री इमरान सर)
फार हलाखीचे जीवन जगताना सुद्धा काही तरी करून दाखवावे हे विचार मॅडमला स्वस्थ बसू देत नव्हते अशात मॅडमनी कॉन्व्हेन्ट उघडून लहान मुलांना शिक्षणाचे दरवाजे उघडून ज्ञान ज्ञानाचे पवित्र कार्य करण्याची मनाची तयारी दाखवउन भाड्याच्या खोलीत के जी 1 चा वर्ग सुरू केला आपल्या मुलाबाळांना सांभाळून हे करत असताना मॅडम ला अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. बाबूजींच्या पगारातून काही पैसे वाचवून अन् शिवणकाम यातून पैसे जतन करून बाबूजींनी एक भूखंड खरेदी केला.त्यावेळी
- मॅडम चा संसार म्हणजे एक अवघड वाट..
- बाबूजींच्या संसार म्हणजे जंगलातील काटेरी वाट..
- कधी अगदीच मयसभा आणि कधी चाकोरीची वहिवाट…
- त्यावेळी मॅडम चा संसार म्हणजे सत्य गोष्टीला होकार…
- अन् असत्य गोष्टीला नकार…!
पती पत्नीचा एकमेकाच्या भावनांचा सन्मान परस्परांच्या मर्यादा समजून घेऊन मॅडमनी एकमेकांना मोठं केलं आहे.तुम्ही कितीही सामर्थ्यवान असाल परंतु वागणुकीत मातायच नाही हे श्रीमती शेख मॅडम कडून शिकण्यासारखं आहे..अशाही हलाखीच्या परिस्थितीतून काही हितचिंतक लोकांना विश्वासात घेऊन नॅशनल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करावी हे मॅडम च दिव्य स्वप्न होत अन् ते मॅडमनी प्रत्यक्षात उतरून दाखवलं.
संस्थेच्या सचिव पदी मॅडम आरूढ झाल्या आपल्या शाळेचे विद्यार्थी इतरत्र कुठेही जाऊ नये म्हणून पहिल्या वर्गाची सुरुवात शिस्त पद्धतीने केली..तत्कालीन आमदार भाऊसाहेब मूलक यांच्या मदतीने प्रार्थमिक अन् माध्यमिक शाळेची मान्यता मिळवून संस्थेद्वारे राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. विनाअनुदानित तत्त्वावर श्याळा सुरू झाली काही शिक्षकाची नियुक्ती करून त्या शिक्षकाचा पगार मॅडम जवळून द्यायच्या.. हे सर्व करत असताना लोकाकडून खूप विरोध पत्करावा लागला होता.दहावीची पहिली बॅच पास होऊन निघाली तेव्हा श्यालेला 50 टक्के अनुदान प्राप्त झाले बहुआयामी व्यक्तिमत्व, उच्चशिक्षित मुख्याध्यापक श्री पंढरी हिवसे सरानी मॅडम च्या मार्गदर्शनात शाळेची प्रगती फळाला आणली..त्यावेळेस सुद्धा मुख्याध्यापकांचे कार्य उल्लेखनीय राहिलेले आहे.शाळेची गुणवत्ता आजतागायत टिकून आहे..
माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देऊन उत्तम कार्य करण्याची संधी शाळेनी आम्हास देलेली आहे..जीवनाला एक संस्कारित वळण लाऊन जीवनामध्ये कर्तुत्व गाजवायचे असेल तर मॅडम कडून धडे गीरवावे जबाबदारी स्वीकारायची असेल तर मॅडम कडून स्वीकारावी..मॅडम नेहमीच सांगतात श्रेष्ठ तेचा अभिमान, खोटे बोलणे,त्रास देणे दुसऱ्यांना कमी लेखणे,क्षमा वृतीचा अभाव मनाची व वानीची कटूता हे सारे दुर्गुण आहे प्रत्येक क्षणी या गोष्टीचा विचार करून जीवन जगावे,चांगले तेच करावे वाईट तेच कटाक्षाने टाळावे म्हणजे आपले जीवन सुखमय होईल..
भिवापूर परिसरात लहानग्या पासून मोठ्यांपर्यंत शेख मॅडम हा शब्द उच्चारला तरी मनात भीतीचे लहरे उठून येतात..शिस्तबद्ध विचारांच्या शेख बाई म्हणून मॅडम च कार्य अबाधित आहे..आजपावेतो मुलांना कॉन्व्हेन्ट पासून विद्यालयात शिकवताना मुलांना मॅडम नी शिस्त लाऊन घडविले आहे..आज कितीतरी विद्यार्थी गण राष्ट्रीय विद्यालयातून शिक्षण घेऊन नाव कमवीत आहे..
किती तरी विद्यार्थी उच्चपदावर आहे.ते कितीही उच्च पदी असोत मॅडम दिसल्यास आदराने नतमस्तक होतात..मॅडम ला नारळाची उपमा देणे उचित ठरेल.त्या कितीही कणखर स्वभावाचे दिसत असेल मात्र आतून नारळ प्रमाणे मऊ,मधूर् स्वभावाच्या आहेत जेवढं त्या रागावतात तेवढ्याच आस्थेने जवळ पण करतात..मॅडम शिक्षक वर्गाना एकेरी शब्दात बोलताना मॅडम ला मी अजूनही बघितलेले नाही.असेच संस्कार मॅडम नी आपल्या परिवारातील मुला बाळांना दिले आहे.ते सुध्दा सर्वांना आपुलकीने वागवतात..
मला आठवतं माझ्या विवाह मंगल सोहळ्यात मॅडम चे पती तथा संस्था अध्यक्ष श्री शेख बाबूजी एक दिवस आधी माझ्या स्व गावी उपस्थित असताना सुद्धा मॅडम माझ्याशी फोनवर आदर्तेने बोलून आशीर्वाद दिले होते.. आजच्या घडीला संस्था चालकांना एवढी आपुलकी जपता येईल का? कदापि नाही. माझ्या देखनित मॅडम च्या सानिध्यात जो तो येतो त्रास मात्र त्यांना होतो..परंतु सुसंस्कार ने शिस्त पद्धतीने तरबेज होऊन जातो..संकटाचा सामना कसा करावा,परिस्थितीला कसं जुळवून घ्यावं ते श्रीमती शेख मॅडम कडून अगदी शिकण्यासारखं आहे…अश्या कर्तव्यनिष्ठ शिस्त प्रिय,मायाळू वृत्तीच्या संस्था सचिव आम्हाला लाभल्या हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.. मॅडम कर्तुत्वाने राष्ट्रीय विद्यालय ही शिस्तीची शाळा म्हणून तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात परिचित आहे..मॅडम च एकच ध्यास असतो विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास..आपल्या शाळेचा विद्यार्थी घडला पाहिजे.विद्यार्थी घडला तरच श्याळेची भिंत ताठ मानेने उभी राहील अन् त्या भिंतीच्या आत तुम्ही गुण्यागोविंदाने राहू शकाल हे मॅडम चे ब्रीद वाक्य..
मॅडम नी लावलेला दिवा आज अखंड तेवत असून त्या दिव्याचा प्रकाश झोतात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान झालेले आहेत.आजच्या घडीला शाळेत 900 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून 25 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी प्राचार्य इमरान शेख सरांच्या मार्गदर्शनात सेवेत तत्पर आहेत..शाळेत सांस्कृतिक,बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वोपरी विकास घडावा करिता श्रीमती शेख मॅडम च्या आणि प्राचार्य सरांच्या मार्ग दर्शनात शाळेतील शिक्षक वर्ग प्रयत्नशील असतो..मॅडम नी शाळेत पाचवी ते बारावी पर्यंत सुसज्ज शिक्षणाची सोय करून दिली आहे शाळेविषयी एवढंच सांगावस वाटेल…
- माय तू.. बाप तू..प्रिय राष्ट्रीय विद्यालय तू..
- अंगभर धम्म पिवळी फुले गर्भ संतुष्ट बाभूळ तू..
- ही मुले धावती रस्त्यावरी प्रीत पावन नभी धूळ तू..
- आज मथुरा जरी कर्मभू सर्व कृष्णास गोकुळ तू..
- सर्व मुंग्या तुला सारखे योग निद्रिस्त वारूळ तू डहाळे फुलांच्या घरी युद्धभूमीवर त्रिशूळ तू…
- चर्च तू.. मज्जिद तू..
- शिक्षणाचा सागर तू..
- शेख मॅडम च्या कर्तुत्वाने उभी आहे आज तू..
- आण तू मान तू भिवापुरची शान तू.कलावंत घडवणारी सोन्याची खाण तू..
- इमरान सरांच्या कार्याने सुंदर प्रवास गतिमान करते आहे तू…
- सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने छान आज फुलते तू…
- छान गोजिरी सुंगंधी मुले घडवणारी प्रिय राष्ट्रीय विद्यालय तू…
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणाचा विकास करता करता माझा सारखा कलाशिक्षक महाराष्ट्र “गुरू गौरवाने” आज सन्मानित झाला आहे अशा व्यासपीठ मिळवून देणाऱ्या शाळेस व मॅडम च्या कार्यास सलाम करतो..ऋणानुबंधची फुले कधीच कोमेजत नसतात.आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळतात अशा शब्दाप्रमाने सर्वाशी आपुलकीने नाती सांभाळणाऱ्या श्रीमती शेख मॅडम ला त्यांच्या 72 व्या वाढदिवशी मी भरभरून शुभेच्छा देऊन त्यांच्या जन्मदिनी त्यांना उत्तम निरोगी आरोग्य लाभो मॅडमची इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी त्यांच्या उर्वरित इच्छांना बळ मिळावे यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून मॅडमला पुनश्च सदिच्छांसह शुभेच्छा देऊन थांबतो…
- धन्यवाद…!
- सुरेश राठोड
- (कलाशिक्षक)
- राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर
- जिल्हा.नागपूर..
- 9765950144