नवी दिल्ली : अनेकजण ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करताना मात्र त्यांना अनेकदा या अधिकच्या कामाचा मोबदला कंपन्यांकडून मिळत नाही. मात्र आता नियोजित वेळेपेक्षा जास्त काम केल्यास कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांना अतिरिक्त मोबदला द्यावा लागणार आहे. केंद्रीय र्शम आणि रोजगार मंत्रालयाने पुढील आर्थिक वर्षापासून नवीन कामगार नियम लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. नवीन नियमांप्रमाणे तयार करण्यात आलेल्या नियमांचा कच्चा मसुदा तयार असून अंतिम मसुदा लवकर तयार होईल असे सांगितले जात असतानाच त्यामध्ये नियोजित वेळेपेक्षा अधिक काम करण्याबद्दलच्या नियमांचाही समावेश आहे.
केंद्र सरकारने २९ कामगार कायद्यातील तरतुदी एकत्रित करून वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता तयार केल्या असून त्याला संसद तसेच राष्ट्रपतींनीही मान्यता ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळाली होती. मात्र यामधील काही नियमांसंदर्भात संशोधन करण्याचा निर्णय घेत कायद्यांची अंमलबाजवणी पुढील आर्थिक वषार्पासून म्हणजेच एप्रिलपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता नवीन नियमांचा समावेश करुन हे नियम कामगार आणि कंपन्या दोघांसाठीही फायद्याचे असतील असा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023