मुंबई : डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला असून तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे राज्यातील निर्बंध आणखी कडक होणार आहेत. सर्व जिल्ह्य़ांना तिसर्या गटाचे निर्बंध लागू करण्यात आले आहे.
राज्यातील र%ागिरी, जळगावसह काही जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे नवा व्हेरिएंट असलेल्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार, कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची संख्या काहीही असली तरी यापुढे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्या स्तरावरच असल्याचे ग्राहय़ धरले जाणार आहे. त्यानुसार, स्थानिक प्रशासनाला आपापल्या जिल्हय़ात कठोर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करताना राज्य सरकारने यापूर्वी पाच स्तर ठरविले होते. त्यासाठी ४ जून रोजी आदेश काढण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा विषाणू सतत रूप बदलत असल्याने व वेगवेगळ्या स्वरूपात हल्ले करत असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे चार जूनच्या आदेशात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
निर्बंधांचे स्तर ठरविताना यापूर्वी कोरोना संसर्गाचा दर गृहित धरला जात होता. मात्र, त्यात अँटिजन आणि आरटी-पीसीआर या दोन्ही प्रकारचे टेस्ट ग्राहय़ धरले जात होते. आता यात बदल करण्यात आला आहे. यापुढे कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर निश्चित करताना केवळ आरटी-पीसीआर चाचण्या ग्राहय़ धरल्या जाणार आहेत. रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा अन्य चाचण्यांचा आधार त्यासाठी घेता येणार नाही.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024