अमरावती : अमरावती महापालिकेसह विविध नगरपालिकांचे कामकाज, ‘महावितरण’कडून राबविण्यात येणा-या योजना व विभागीय क्रीडा संकुल समितीचे कामकाज आदी महत्वपूर्ण विषयांवरील बैठका पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (30 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहेत.
पालकमंत्र्यांच्या नियोजित दौ-यानुसार, शुक्रवारी सकाळी 9.55 वाजता निवासस्थानावरून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक, सकाळी 10.30 वाजता महावितरणअंतर्गत विविध योजनांचा आढावा, सकाळी 11.30 वाजता महानगरपालिका, विविध नगरपालिका कामकाज आढावा, दुपारी 12.30 वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी समिती यांच्यासमवेत भेट, दुपारी 1 वाजता दर्यापूरसाठी प्रयाण.
दुपारी 1.30 वाजता वलगाव- दर्यापूर रस्त्यावर वृक्षारोपण कार्यक्रम, दुपारी 1.50 वाजता दर्यापूर येथे वृक्षारोपण, दुपारी 2.10 वाजता शहादत खाँ पठाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी 2.30 वाजता सामदा, ता. दर्यापूरकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता सामदा, ता. दर्यापूर येथे आगमन व जलपूजन कार्यक्रम, दुपारी 3.30 वाजता अंजनगाव सुर्जी तालुक्यात मौजे दहिगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, सायंकाळी 5 वाजता मोझरीकडे प्रयाण, सायंकाळी 6 वाजता मोझरी निवासस्थानी आगमन व राखीव.