दारव्हा : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या विरोधात दारव्हा तालुका राष्ट्रवादी युवक काॅग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज दारव्हा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे “अबकी बार महेंगाई पर वार” करण्यासाठी आज दारव्हा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस दारव्हा तालुका तर्फे “घरगुती गॅस, अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान भरपाई, इंधन दरवाढ, महागाई विरोधात योग्य ती मदत करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, दारव्हा यांचे मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
आधीच कोरोना मुळे डबघाईस आलेले व्यवसाय आणि त्यात दिवसेंदिवस वाढणारी महागाई या मुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नियंत्रण आणून महागाई कमी करावी यासाठी आज उपविभागीय अधिकारी,दारव्हा यांचे मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. दर दिवसाला महागाई उचांक गाठत असून जिवनावश्यकवस्तू चे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत. पेट्रोल शंभरी पार गेले असून यामुळे सामान्य माणसाचा खिसा खाली झाला आहे. गॅस सिलेंडर भरणे सुद्धा गरिबांना परवडणे मुश्किल झाले आहेत. यात भर म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालयाने खताचे सुद्धा भाव वाढवल्याने शेतकरी राजा वर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत वाढत्या महागाई ने देशातील जनता कंटाळली असून यावर कुठे तरी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी दारव्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पंतप्रधान कार्यालयाला निवेदन सादर केले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी,दारव्हा यांचे मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, सेवादल जिल्हाध्यश शेषराव राठोड, तालुकाध्यश प्रा. चरण पवार, शहराध्यश नसीर शेख, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस प्रा. सुभाष गावंडे, महिला तालुकाध्यशा सौ. सोनाली राऊत, महिला शहराध्यशा सौ. प्रगती गुल्हाने, युवक शहर अध्यश साजिद शेख, जिल्हा सरचिटणीस रामदास राऊत, चंदन चव्हाण, पुनेन्द्र येळणे, जावेद शेख, प्रवीण जाधव, रवी जाधव,तालुकाध्यश मिडिया सेल रामेश्वर राठोड, विजय राठोड, सुमित जाधव,प्रकाश आरे, अरुण राठोड इत्यादि बहुसंखेने हजार होते.
—–