मुंबई : घर खरेदी-विक्री करणार्यांच्या खिश्याला आता कात्री बसणार आहे. घर जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. गुरुवार १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात असलेली २ टक्के सवलत रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता घर, जमीन विक्रीसाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. मुद्रांक शुल्कात सवलत देण्याबाबत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता. पण वित्त विभाग आणि मुख्यमंत्री यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे आधी मुद्रांक सवलत मिळत होती, ती मिळणार नाही. राज्यातील बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षी राज्यशासनाने दिनांक ३१ मार्चपयर्ंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. सदर सवलत संपुष्टात आली असून यापुढे नियमित स्वरूपात मुद्रांक शुल्काचे दर लागू राहतील.
मुद्रांक शुल्कात सवलत देण्यासाठी आणि मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता पण वित्त विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास मंजुरी दिली नाही.
त्यामुळे उद्या पासून या आधी मुद्रांक सवलत होती ती मिळणार नाही. त्यामुळे आता उद्यापासून मुद्रांक शुल्कात २ टक्के सवलत होती ती रदद् केली आहे. याबाबतचा निर्णय होत असताना महाविकास आघाडीतील मतभेद देखील चचेर्चा विषय झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, राज्याचे महसूल विभागाच्या अंतर्गत मुद्रांक शुल्क विभाग येतो आणि महसूल विभागाच्या वतीने यापूर्वी देण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी वरील सवलत कायम राहावी अशी भूमिका घेतली होती. पण त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाने हरकत घेतल्याचे समजते.
तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने देखील त्याला फारसे अनुकूल मत व्यक्त केल्यामुळे मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आल्याचे समजते. वास्तविक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काही महत्त्वाचे नेते यांच्या मत होते की, सध्या परत एकदा कोरोनाचे संकट वाढेल अशा काळात बांधकाम व्यवसायिक तसंच घर खरेदी विक्री जमीन करणार्या लोकांना देखील स्टॅम्प ड्युटीच्या निमित्ताने सवलत देण्यात यावी.
किमान तीन महिने सवलत द्यावी अशा स्वरुपाची भूमिका होती पण त्यास मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या वित्त विभागाने ग्रीन सिग्नल न दिल्याने मुदतवाढ देण्यात आली नाही असे समजते.