गोवा/मुंबई,: दिग्दर्शक प्रतिक शर्मा त्यांच्या ‘लोटस ब्लूम्स’ या मैथिली फिचर फिल्म मागील प्रेरणेबद्दल सांगताना म्हणाले की निसर्ग आणि लोकांच्या साक्षीने एका व्यक्तीचा भावनिक प्रवास चितारणे हा या चित्रपट निर्मितीच्या मागचा विचार होता. पण त्यांना हा विचार रंजक पद्धतीने मांडायचा होता. आपल्या सृष्टीने एखाद्यासाठी जे योजलेले असते ते नेहमीच घडते, कधी कधी ते अनपेक्षित पद्धतीने घडते आणि अशा वेळी मानवी योजना अपयशी देखील ठरतात अशा शब्दांत पटकथाकार अस्मिता शर्मा यांनी ‘लोटस ब्लूम्स’ची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट केली. “कधीकधी आयुष्याचा प्रवास बिकट होऊन जातो, पण जेव्हा तुम्ही स्वतःला निसर्गाच्या आणि परमेश्वराच्या पायाशी लीन करता तेव्हा आश्चर्यकारकरित्या अडचणी दूर होतात,” त्या पुढे म्हणाल्या.
53 व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचा कलाकार वर्ग आणि इतर तंत्रज्ञांनी पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला.
53व्या इफ्फीमध्ये रेड कार्पेटवर ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचे पथक इफ्फीमध्ये 23 नोव्हेंबर 2022 रोजी ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रतिक शर्मा, निर्माता आणि पटकथाकार अस्मिता शर्मा, अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा आणि चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार परिषदेत अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा आणि दिग्दर्शक प्रतिक शर्मा
- चित्रपट सारांश
53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात मैथिली भाषेतील ‘लोटस ब्लूम्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात संदेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतीकांचा वापर करून एक आई आणि मुलातील भावनिक बंधाचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात फार कमी संवाद आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारच्या अंतर्गत भागांमध्ये करण्यात आले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–