Skip to content
पाहणार कसा । देव तुझ्याकडे ।
घातली साकडे । किती जरी ।।
देव भोळा आहे । भोळे आहे मन ।
विश्वाचे जतन । तोच करी ।।
ज्यांनी मायबाप । त्यागले असेल ।
कठोर बनेल । त्यांच्यासाठी ।।
भोळ्यासाठी भोळा । राहतो नेहमी ।
ठेवणार कमी । काही नाही ।।
दोन शब्द बोला । सर्वांशी प्रेमाने ।
मिळाला भाग्याने । नर देह ।।
बघू शकतोस । कामात देवाला ।
तुझ्या कर्तव्याला । जाग आधी ।।
आनंदी दिसतो । तोचि सदा ।।
पैशाने सन्मान । मिळणार नाही ।
फिरलास दाही । दिशा जरी ।।
धरून चरण । सेवेमध्ये जग ।
जगासासाठी मोठा । कितीही झालास ।
मनात गर्वास । पाळू नको ।।
नित्य असशील । आईसाठी सान ।
कितीही महान । झाला जरी ।।
आईबाप सुखी । ज्यांचे असणार ।
देव बघणार । त्यांच्याकडे ।।
अजु योग्य मार्ग । सेवेमध्ये फक्त ।
पालकांचा भक्त । बन वेड्या ।।
तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
Like this:
Like Loading...