अमरावती : रोहणा येथील जेष्ठ कवि, समिक्षक अरुण हरिभाऊ विघ्ने यांचा पाचवा कवितासंग्रह ‘पिंपळ व्हायचंय मला’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि.२८/११/२०२१ रोजी लुंबीनी बुद्ध विहार, पुलगाव येथे पद्माकर अंबादे, मोरेश्वर सहारे, निवेदक जगदीश भगत, प्रा.डाँ. भूषण रामटेके, कवि अरुण विघ्ने, के. पाटील, पत्रकार किरण उपाध्ये, कवि,चित्रकार, राज्याध्यक्ष स.सै.दल संजय ओरके यांचे हस्ते पार पडला.
यावेळी कवि,समिक्षक प्रशांत ढोले, प्रा.डाँ.अरविंद पाटील, डाँ. भुरकुंडे, प्रा. सुषमा पाखरे, प्रकाश जिंदे, प्रकाश बन्सोड, सिद्धार्थ डोईफोडे, कुंभारेबाबू, आणि असंख्य कवि, गायक, वाचक रसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी कविसंमेलनही पार पडले.