मुंबई: अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. अमिताभ आणि कौन बनेगा करोडपती यांचे नाते खूपच खास आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे फॅन्स अमिताभ यांच्याशिवाय या कार्यक्रमाचा विचार देखील करू शकत नाही. पण अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून रिटायर्ड होत आहेत का असा प्रश्न या कार्यक्रमाच्या चाहत्यांना पडलेला आहे.
अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागासाठी चित्रीकरण केले. त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, मी आता थकलेलो आहे आणि रिटायर झालोय.. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागू इच्छितो.. कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण खूपच लांबले.. कदाचित उद्या पुन्हा करेन. मात्र हे लक्षात ठेवा की काम तर काम असतं आणि ते तन्मयतेने करायला हवं.
शुटींगच्या शेवटच्या दिवशी फेअरवेलच्या निमित्ताने खूप सारं प्रेम मिळालं. शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. इच्छा हीच आहे की, कधीच थांबायचे नाही, सतत चालत रहायचे.आशा आहे की हे सगळं पुन्हा होईल. सेटवर सगळ्यांनी कायमच माझी काळजी घेतली. अनेक महिन्यांपासून सगळे जण एकत्र होतो. ते क्षण कायम आठवणीत राहतील. कौन बनेगा करोडपतीच्या क्रू मेंबर आणि सर्व टीमचे आभार.
अमिताभ यांची पोस्ट पाहून अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपतीचा हा शेवटचा सिझन आहे का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला आहे. अमिताभ यांनी पुढच्या सिझनमध्ये देखील सूत्रसंचालन करावी अशी आशा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024