- * सदस्यता नोंदणी, प्रशिक्षण, प्रचारातून बांधा क्रियाशील सभासदांचे मोहोळ
- * प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : सद्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सभासद नोंदणीवर भर दिल्या जात आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करीत पक्ष बळकटीसाठी सर्वानी एकजुटीने काम केल्यास क्रियाशील सदस्यांचे मोहोळ तयार करून हे सदस्यत्व अभियान जोमाने राबविले जाईल, या सोबतच केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीवर कटाक्ष करीत वाढती, महागाई, जीवनावश्यक वस्तूरील जिएसटी कर तसेच पेट्रोल -डिझेल व सिमेंटच्या वाढत्या किमती, केंद्र सरकारचे सामान्य जनता विरोधी शोषण, फसव्या घोषणा आदी बाबत लोकांमध्ये चेतना निर्माण केल्यास त्यांच्या मत परिवर्तनातून जनतेची मोठी शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने उभी राहील, यासाठी राष्ट्रवादीच्या क्रियाशील सभासदांची गजर असल्याचे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले. रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी धर्मदाय कॉटन फंड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद बैठकीत त्यांनी यावेळी अमरावतीमधील राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंट चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सर्वप्रथम अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेशध्यक्ष जयंतराव पाटील यांचे शाल, पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. पुढे संवाद संबोधित करतांना ते पुढे म्हणाले की, सद्या पक्षाच्या वतीने संघटात्मक बांधणीचे काम जोमात सुरु असून सदस्यता नोंदणी अभियान, प्रशिक्षण वर्ग व प्रचार यंत्रणा या महत्वपूर्ण बाबींवर अधिक जोमाने लक्ष दिल गेलं पाहिजे,त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करायचा असून धर्माच्या नावावर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर आगामी निवडणीची जोमाने तयारी करण्याचे स्फ्रूर्तीदायी आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक संवाद बैठका राज्यात होत असतांना अमरावती शहराचे काय होणार याची चिंता वाटत होती, मात्र अमरावतीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात पक्षांना नवी उभारी मिळाली असून येथील जनतेला सहज उपलब्ध होणारे नेतृत्व लाभले असल्याचे समाधान वाटत आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यश हे विशेष व मोठे असणार यात काही शंका नसल्याचे जयंतराव पाटील यांनी आवर्जून अधोरेखित केले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी अमरावती मनपा क्षेत्रात अस्तित्वात आलेली प्रभाग रचना ही यथावत कायम राहिल्यास ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करिता फायद्याची ठरणारी आहे. सन २००४ पासून ते आतापर्यंतचे मनपातील पक्षाचे व अन्य पक्षांचे संख्याबळाकडे लक्ष वेधीत राष्ट्रवादीला विचारत व विश्वासात घेतल्या शिवाय एकहाती सत्ता मनपात मिळविता येत नाही, असे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. सद्या स्वतंत्र पणे निवडणूक लढण्याला घेऊन जोमात तयारी सुरु असली तरी पक्षाचा आदेश हा अंतिम व शिरोधार्ह राहील, असे विश्लेषण संजय खोडके यांनी केले. जयंतराव पाटील यांनी मेहनत व तपश्चर्या काय असते याचा आदर्श घालून दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्व नेते हे सर्व धर्मीय बांधवांना सोबत घेऊन वाटचाल करीत आहेत. त्यामुळे रात्रंदिवस एक करून सर्व कार्यकर्त्यांनी आपली शक्ती पणाला लावल्यास पुढील महापौर राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास संजय खोडके यांनी व्यक्त केला.
- * अमरावती व बडनेरात राष्ट्रवादीची ताकद वाढली- शहराध्यक्ष प्रशांत डवरे
संजय खोडके सक्रिय झाल्यापासून पक्षाचा विस्तार व व्याप दिवसागणिक वाढतच चालला आहे. अल्पसंख्याक बहुलभागात व्यापक व पर्याप्त निधी उपलब्ध करून दिल्याने तिथे पक्षाची ताकद व जनाधाराचा वाढता आलेख दिसून येत आहे. यासोबतच ओबीसी, सेवादल, युवक, विद्यार्थी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर पक्षाचे वतीने जनसंपर्कावर सातत्य पूर्ण भर दिला जात आहे. तसेच रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वातंत्र्य सैनिक सत्कार, चित्रकला स्पर्धा, आदी उपक्रम राबवून समाजाभिमुख राहून पक्ष शहरात काम करत असल्याचे प्रशांत डवरे यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात अग्निपथ योजना व महागाई विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असल्याचे सुद्धा यावेळी प्रशांत डवरे यांनी सांगितले. यावेळी निरीक्षक आर्या, माजी नगरसेविका प्रा.डॉ. जयश्री मोरे, सनाउल्ला सर यांची समयोचित भाषणे झालीत.
- * राष्ट्रवादीत प्रवेशित मान्यवरांचा सत्कार
राष्ट्रवादीच्या संवाद बैठकी दरम्यान पक्षात प्रवेशित झालेल्या मान्यवरांचा प्रदेशध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक रतन डेंडुले, सपना ठाकूर, मंगेश मनोहरे, तेजस लेंधे, संजय गायकवाड, हाजी रफिक,यांचा समावेश होता. यासोबतच नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण इचे, शहराध्यक्ष गजानन अजानक, ओबीसी सेल चे शहराध्यक्ष प्रा, दिलीप शिरभाते यांना प्रदेशाध्यक्ष महोदयांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष-जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संवाद बैठकीत व्यासपीठावर सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष-जाणाबा मस्के, प्रदेश उपाध्यक्ष व विभागाचे समन्वयक-संजय खोडके, शहर निरीक्षक-आर्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर निरीक्षक-करण ढेकले,माजी खासदार-सुबोध मोहिते, महिला निरीक्षक वर्षा निकम, प्रदेश पदाधिकारी-प्रा.डॉ. हेमंत देशमुख, डॉ. गणेश खारकर, प्रवीण कुलटे, ऍड. सुरेशराव कडू,शहराध्यक्ष-प्रशांत डवरे,माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, रीना नंदा, माजी नगरसेवक-रतन डेंडूले ,सपना ठाकूर, मंगेश मनोहरे, जितेंद्रसिंह ठाकूर , राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष-वहिदखान,युवकांचे अध्यक्ष-ऋतुराज राऊत, विद्यार्थी चे अध्यक्ष-आकाश राऊत,डॉक्टर सेलचे अध्यक्ष राजेंद्र दाळू, आदींसह सर्व फ्रंट चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जुनघरे यांनी केले तर कार्यक्रमा अंती सर्व उपस्थितांचे प्रशांत डवरे यांनी आभार मानले.