- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या थकीत मालमत्ता कराचा व चालु कराचाही भरणा दिलेल्या मुदतीच्या आत भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य कर मध्ये पहिल्या टप्प्यात दोन तर दुस-या टप्प्यात एक टक्का सवलत मिळणार आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने कर भरल्यास एक टक्क्यापासून ते तीन टक्क्यांपर्यंत सूट मिळविता येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी दिली.
चालू आर्थिक वर्ष सन २०२२-२३ करिता मालमत्ता कराचा भरणा ३० सप्टेंबर,२०२२ पर्यंत प्रत्यक्ष / व्यक्तिश: संबंधीत झोन कार्यालयात जावून केल्यास मालमत्ता कराचे सामान्य करामधून सामान्य कराच्या २ टक्के सवलत देय राहील.मालमत्ता कराचा भरणा १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर,२०२२ पर्यंत प्रत्यक्ष / व्यक्तिश: संबंधीत झोन कार्यालयात जावून केल्यास मालमत्ता कराचे सामान्य करामधून सामान्य कराच्या १ टक्के सवलत देय राहील.
आर्थिक वर्ष सन २०२३-२०२४ व त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या कालावधीत एप्रिल व मे महिन्यामध्ये मालमत्ता कराचा भरणा केल्यास मालमत्ता कराचे सामान्य करामधून सामान्य कराच्या २ टक्के सवलत आणि जुन ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मालमत्ता कराचा भरणा केल्यास १ टक्के सवलत देय राहील. तसेच ऑनलाईन पध्दतीने कर भरणा करण्याकरीता नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद प्राप्त व्हावा, यासाठी सन २०२२-२०२३ मध्ये उपरोक्त कालावधीसोबतच अतिरिक्त १ टक्का सवलत देण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.