अमरावती : जिल्हा वार्षिक योजनेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ३00 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय झाला.नियोजन समितीच्या सभागृहात सन २0२१/२२ या वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या प्रारूप आराखड ्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोलाचे पालकमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह, तसेच अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध नियोजित कामांबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सादरीकरण केले. नियोजनासाठीचा निधी २८५ कोटी रूपयांवरून ३00 कोटी रूपयांपयर्ंत वाढवून मिळण्याची मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर व विविध लोकप्रतिनिधींनी केली, त्याला मान्यता देत उपमुख्यमंत्री महोदयांनी ३00 कोटी रूपयांच्या तरतुदीला मान्यता दिली. कोरोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. तरीही जिल्हा नियोजनचा पूर्ण निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच आमदार निधीत कोणतीही कपात केलेली नाही. कोरोनाचा काळ, विधान परिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे निधी खर्च होण्यासाठी निविदा कालावधी कमी करून देण्यात आला आहे. त्यामुळे विभागांनी उपलब्ध निधी तातडीने खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासोबतच जिल्हा नियोजनच्या कार्यकारी समिती आणि उपसमिती स्थापन करून त्याचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री यावेळी दिले. वन कायद्याचा मेळघाटातील विकास कामावर होणारा परिणाम याबाबत निर्णय घेणार. परवानगी मुख्य वनसंरक्षक स्तरावर करण्याचा विचार आहे. विभागीय आयुक्त आणि सचिव यांच्यासह बैठक घेऊन प्रश्न सोडवू. खारपाणपट्ट्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वतंत्र धोरण आणणार, असेही ते म्हणालेे.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023