अमरावती : देशात कोरोनाची स्थीती व्हेंटीलेटरवर असतांना देशासह राज्यातील अनेक भागात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असत्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना लसीच्या आगमणनंतर ही परिस्थीती आटोक्यात येईल अशी दाट शक्यता वर्तविल्या जात असतांना ज्या लोकांनी कोरोना लसी घेतल्या आहेत अशांना देखिल पुन्हा कोरोनाची लागन झाल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण होईल का अशी भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे. जिल्हयात आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार ३५९ रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आलेआहेत. परिणामी जिल्हयात २३ हजार ८३५ कोरोनाग्रस्त आढळुन आले असून आतापर्यत ४२७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अमरावती जिल्हयात कोरोना रूग्णां विषयी रोजच धक्कादायक माहिती समोर येत असुन रूग्णसंख्या अगदी तिव्र गतीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वाढत असलेला थंडीचा जोर आणि प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून होत असलेले उल्लंधन या दोन महत्वपूर्ण कारणामुळे कोरोनाचा मोठया प्रमाणात फैलाव होत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. रूग्ण संख्या वाढु लागल्याने शहरासह जिल्हयातील रूग्णालये व दवाखाने पुन्हा गच्च भरल्याचे दिसून येत आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे प्रशासनाकडून सक्तीचे पाऊल उचलले जात असून त्रिसुत्री नियमांचे पालन न करणार्या विरूध्द मोठया प्रमाणात कारवाईचा बडगा उचलल्या जात आहे.विशेष म्हणजे परिस्थती ही चिंताजनक असतांना सुध्दा रस्त्यावर फिरणारे नागरिक हे अदयापही नियमांचे पालन करतांना दिसून येत नाही.सातत्याने वाढत असलेल्या रूग्णामुळे पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण होईल का ?असा यक्ष प्रश्न आता नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. कोरोनाचे सावट हे अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हयात पसरले असुन ग्रामिण भागातील कोरोना रूग्णांचा आकडा देखिल दिवसेदिवस वाढत चालला आहे. १0 फेब्रुवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ३५९ रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आलेआहेत. परिणामी जिल्हयात २३ हजार ८३५ कोरोनाग्रस्त आढळुन आले असून आतापर्यत ४२६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023