मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या होम क्वॉरंटाईन असल्याची माहिती आहे. देशात कोरोनाचा वेग वाढला असताना अनेक सेलिब्रिटीजही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये आता आमिर खानचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमिर खान हा होम क्वारंटाइन असल्याची माहिती आहे. तो आपल्या घरीच क्वारंटाइन असून सर्व प्रोटोकॉल्स फॉलो करत आहे. त्याची तब्येत बरी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे त्याच्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी आणि सर्व नियमांचे पालन करावे. असे त्याच्या टीमने सांगितले आहे.आमिर खानने दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावरील कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा निवासस्थानी झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024