अमरावती:अमरावती जिल्हातील वलगाव येथील आपले सरकार सेतू केंद्र अपंग/महिला बचत गटास देण्याकरिता जिल्हाधिकारी अमरावती मार्फत जाहिरात निघाली होती. परंतु जाहिरातीतील शर्थी व अटीत अपात्र तसेच बनावटी कागदपत्रे बनविण्याऱ्या शेख हमीद शेख वाहेद यास आर्थिक देवाणघेवाणीतून आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आल्याने वलगाव येथील पात्र उमेदवार अपंग सागर संजय तसरे दि. १५ बुधवार पासून पब्लिक पार्लमेंट च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुल्या भ्रष्ट्राचाराविरोधात आमरण उपोषण बसणार आहेत.
याबाबत सविस्तर असे कि महाराष्ट्र सरकारने गावातील नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा मिळाव्या म्हणून आपले सरकार सेतू केंद्र गावागावात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या धोरणानुसार गावातील अपंग तथा महिला बचत गटास देणे जिल्हा निवड समितीस बंधनकारक असून सुद्धा उपजिल्हाधिकारी रणजित भोसले सदस्य सचिव जिल्हा समिती अमरावती यांनी आर्थिक घेवाण देवणीतून शेख हमीद शेख वाहेद यांना आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आले. या संबंधात अपंग सागर संजय तसरे यांनी माहितीच्या अधिकारात शेख हमीद शेख वाहेद यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती मिळविली असता शेख हमीद शेख वाहेद यांनी वलगाव येथील सरपंच मोहिनी मोहोड यांनी त्यांच्या पतीच्या सहकार्याने दि. २९/१२/२०२० रोजीचे रहिवासी दाखला देण्यात आला. दिलेल्या दाखल्यावर सरपंचाच्या पतिने सरपंचाची सही केली तसेच शेख हमीद शेख वाहेद यांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र दि. २९/१२/२०२७ जिल्हा शल्य चिकित्सकाचे खोटे व बनावटी प्रमाणपत्र दाखल केल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे ! संबंधित खोटे कागदपत्रे बनविण्यास वलगाव सरपंच मोहिनी मोहोड ताठ तिचे पती विठ्ठलराव मोहोड तसेच उपजिल्हाधिकारी रणजित भोसले सदस्य सचिव जिल्हा समिती अमरावती यांनी मदत केली!
या भ्रष्ट्राचाराच्या विरोधात सागर ठाकरेचे उद्या दि. १५ बुधवार पासून आमरण उपोषण सुरु होणार असून शेख हमीद शेख वाहेद यांचे आपले सरकारं सेतू केंद्र त्वरित रद्ध करण्यात यावे. खोटे व बनावटी रहिवासी दाखले देण्याऱ्या सरपंच मोहिनी मोहोड व त्यांचे पती विठ्ठलराव मोहोड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे. उपजिल्हाधिकारी रणजित भोसले सदस्य सचिव जिल्हा समिती अमरावती यांनी केलेल्या भष्ट्राचाराची चौकशी करून निलंबित करण्यात यावे तसेच गावातील पात्र उमेदवार सागर संजय तसरे यांना आपले सरकार सेतू केंद्र देण्यात यावे.या मागणीकरिता अपंग सागर संजय तसरे आमरण उपोषण करणार आहेत हे उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत अविरत राहणार असल्याचा निर्धार पब्लिक पार्लमेंटचे कार्यकर्ते सागर संजय तसरे यांनी केला आहे. असे पत्रकाद्वारे ऍड. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.