मुंबई: बॉलिवूडची बेगम बेबो करिना कपूर खान लवकरच दुसर्यांदा बाळाला जन्म देणार आहे. सप्टेंबरमध्ये करिना कपूर आणि सैफ अली खानने त्यांची गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. दोघेही बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. फेब्रुवारीमध्ये ती आपल्या दुसर्या बाळाला जन्म देणार आहे. करीना कपूरचे चाहते या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या ती प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. करिनाने २0१६ मध्ये तैमुरला जन्म दिला होता. ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये तिने तैमूरला जन्म दिला होता.
डॉ. रुस्तम फिरोझ सोनावाला यांनी करिनाची पहिली डिलिव्हरी केली होती. विशेष म्हणजे करिश्मा कपूर आणि करिनाच्या जन्मावेळी यांनीच आई बबिता कपूर यांची डिलिव्हरी केली होती.याशिवाय नीतू सिंह, गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलिव्हरी डॉ.सोनावाला यांनीच केली होती. अनुष्काची पहिली डिलिव्हरी देखील डॉ. सोनावाला यांनीच केली आहे.
त्यामुळे आता करिनाची दुसरी डिलिव्हरी देखील हेच डॉक्टर करणार आहेत. वैद्यकिय क्षेत्रात डॉ. सोनावाला प्रसिद्ध डॉक्टर असून १९४८ मध्ये त्यांनी त्यांच्या प्रॅक्टीसला सुरुवात केली होती. आता डॉ. सोनावाल ९१ वर्षांचे आहेत. पद्मश्री पुरस्काराने त्यांन सन्मानित करण्यात आले आहे.
प्रेग्नेंसीच्या शेवटच्या महिन्यातही काम करतेय करीना कपूर
आपल्या प्रेग्नेंसीदरम्यान करीना काम करते आहे. याबद्दल तिने सांगितले की, मी कधीच प्लानिंग करत नाही की मला हे करायचे किंवा ते. इथे फक्त ही गोष्ट आहे की तशी व्यक्ती नाही जी घरी बसून हे म्हणेल की आता मी काहीच करणार नाही. मी तेच करते जे मला करायचे आहे.
अशात काम करणे योग्य नाही मग ते गर्भावस्थेदरम्यान किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. कोणी सांगितले आहे की गरोदर महिला काम करू शकत नाही? वास्तविकतेत तुम्ही जितके सक्रीय होतात बाळ तितकेच स्वस्थ होते आणि आई सर्वात जास्त आनंदी राहते.
प्रसूतीनंतर जेव्हा तुम्ही फिट असल्याचे समजतात तेव्हा तुम्हाला तेच केले पाहिजे जे तुम्हाला करायला चांगले वाटते आणि मुलांना वेळ देण्यासोबत तुमचे काम आणि स्वत:मध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. मला नेहमीच एक कामकाज करणारी आई असण्याचा अभिमान वाटतो.
Related Stories
October 9, 2024