पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात, औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्या कुंकूमिर्शित तांदळांना अक्षता म्हणतात. मूळ संस्कृत शब्द ह्यअक्षत हा आहे. ह्यअ +क्षत अशी याची फोड आहे. (क्षत म्हणजे जखम) अक्षतचा अर्थ सुरक्षित, दु:ख विरहित. याचा एक अर्थ कल्याण असाही आहे. हा शब्द अक्षदा असा लिहिण्याची चूक होऊ शकते. ती टाळावी.
अक्षता शब्दाविषयी थोड.ी अजून माहिती! आपण लग्नात (फक्त तांदूळ – अक्षता वापरतो. दुसरे कोणतेही धान्य नाही) अक्षता वापरतो याची खालील दोन महत्त्वाची कारणे आहेत.
तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही. त्याला आतून कीड पडत नाही. म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते. दुसरे म्हणजे तांदळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावं लागते. तेव्हा ते खरे बहरते.! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे. पण लग्नानंतर दुसर्या घरी जाते आणि तिथे ती बहरते. यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी आहे. असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात. आपल्या कडच्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत. पण आपल्याला त्याची माहिती नसते. हे दुर्दैव!!
Related Stories
September 3, 2024