मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय असून तिथे लॉकडाउन लावण्याचा विचार केला जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला कोरोना ग्रासले आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकार्यांंना बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. आपल्याकडून डॉक्टर साळुंखे यांना आम्ही आढावा घेण्यासाठी पाठवले होते. त्यांनी सकाळीच मला सांगितले, आपण येथील चौकात असून कोणीही मास्क वापरत नाही. संख्या झपाट्याने वाढत असताना कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याची चर्चा झाल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोललो, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. लग्नकार्य महत्त्वाचे आहे की कोरोनामध्ये माणसांना वाचवणे महत्वाचे आहे? नवरा, मुलगा आणि काही ठरावीक लोक अशी लग्न झाली ना..परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हे रोखायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर, स्वच्छता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे जानेवारी अखेपयर्ंत रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज होणार्यां्ची संख्या जास्त होती. पण १ फेब्रुवारीपासून पॉझिटिव्हची संख्या वाढू लागली आहे. त्यातही अमरावती, नागपूर, वर्धा आणि काही प्रमाणात नाशिकमध्ये दिसत आहे, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024