“समाजात तीन रंगाचे महत्व वाढले आहे काळा, खाकी व पांढरा. समाजस्वास्थ बिघडल्यामुळे समाजात वकील , पोलीस, डॉक्टर यांची संख्या झपाट्याने वाढत आहे यात कुठेच समाजसेवक दिसत नाही. समाजा सक्षम पणे करणारा पुढारी नेता, कुठेच दिसत नाही.” भ्रष्टाचार, व्यसन, अज्ञान अश्या अनेक बाबीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. परंतु समाजाला एक सुशिक्षित, प्रामाणिक, सकारात्मक जर लाभले तर कुटुंब, समाज, गाव, व पर्यायाने देशाचा विकास साधता येतो हे या कादंबरीचे नायक राजेश च्या माध्यमातून मांडले आहे.
लेखक मा. शेषरावजी खाडे हे श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे सचिव पदावर कार्यरत असून १३ जून २०२१ रोजी त्यांची “अउत्या” कादंबरी प्रकाशित झाली. लेखक महाराष्ट्र शासकीय सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणून बी.डी.ओ., उपायुक्त, विकास, अति. आयुक्त पदावर कार्यरत होते. अउत् जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. कादंबरी मध्ये शेतकरी व शेतमजूर वर्गाला जीवन जगण्यासठी करावा लागणारा संघर्ष, शेतकरी व शेतमजूर यांच्यातील परस्पर संघर्ष याचे वास्तविक दर्शन, सरकारी योजनेतील भ्रष्टाचार व शासकीय योजना समाजासाठी शाप आहे की वरदान हा प्रश्न कादंबरी वाचत असताना पडतो. तसेच शेतीचे शास्त्र, स्त्रीयाची भूमिका, शेतकरी आत्महत्या, व्यसन ही समाजाला लागलेली किड, शेतकऱ्याचे पशु प्रेम, शेतकरी नेत्याची भूमिका, सामाजिक स्वास्थ, मानवी स्वभावाचे वर्णन अश्या अनेक विषयांची चर्चा अउत्या या वास्तववादी कादंबरीत कादंबरीकार मा. शेषरावजी खाडे यांनी केली आहे. लेखक आपल्या शासकीय सेवेचा अनुभवासोबतच एक शेतकरी असल्याची जाणीव या कादंबरीद्वारे होते.
अउत्या ही सत्य घटनेवर आधारित कादंबरी असून एकाच कुटुंबातील तीन जीवनगाथा कादंबरीतून मांडली आहे. जागोबा, शंकर, राजेश हे तीघेही प्रामणिक शेतकरी आहेत. नायक राजेशचे वडील शंकर एक सधन यशस्वी शेतकरी असूनही कालांतराने सामाजिक परंपरा, दुष्काळ, शासकीय योजना, भ्रष्टाचार यामुळे होणारी पिळवणूक व त्यातून शंकररावांनी हरवलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांच्या जीवनात नकारात्मकता येते.
कादंबरीची सुरुवात आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न जुळत नाही, मुलगा राजेशच्या शिक्षणाचा खर्च, शेतीमध्ये नापिकी अश्या अनेक समस्यातून मार्ग काढण्यासाठी आत्महत्या हा शेवटचा पर्याय म्हणून जीवनाची यात्रा संपविण्यासाठी निघालेल्या एक अगतिक शेतकरी शंकरराव यांच्यापासून होते. मधेच मारोती भाट त्यांना भेटतो व मुलीचे लग्न जुळविण्याचा निरोप घेवून येतो त्यामुळे लग्न जुळण्याच्या आशेने आत्महत्या करण्यास निघालेले शंकरराव मागे वळतात. हिच घटना शंकररावाच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरते.
अठराविश्व दारिद्र्यात जगत असलेला जागोबा म्हणजे शंकररावचे वडील व नायक राजेशचे आजोबा गावात एकटाच एका झोपडीत राहतो. कालांतराने गावातील सावकाराचे शेत वाहतो व प्रामाणिकपणे कष्ट करून उत्तम शेती पिकवितो तेव्हा पासून तो एक साल गड्याचा अउत्या होतो. या अउत्या च्या जीवनात एक मंजुळा चे आगमन होते. मंजुळा व जागोबा यांची प्रेम कहाणी वाचकाला मोहात पाडते व त्याकाळी अव्यक्त होणाऱ्या मानवी भावनेला व्यक्त केलेल्या आहे.
कादंबरीतील मंजुळा, पार्वती, सोनू, रेणुका, आवडी या स्त्री व्यक्तीरेखांची भूमिका महत्वपूर्ण असून अतिशय जबाबदारीने लेखकाने रेखाटल्या आहेत. या कादंबरीतील स्त्री ही केवळ चूल आणि मूल पर्यंतची जुनाट आणि पारंपारिक भूमिका मोडीत काढून प्रेमळ, कणखर, निर्णयक्षम, आशावादी, दूरदृष्टी, विज्ञानवादी दृष्टीकोन आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणाऱ्या दिसून येतात. लेखक म्हणतात की, “स्त्री hr लगेच खचून जाणारी नसून संकटाला समोर जाणारी व त्यातून सुटका करण्यासाठी त्याग करण्याची तयारी असणारी असते. ती त्यागाची परिसीमा आहे” याची प्रचीती आपल्याला येते. नायक राजेशची पत्नी रेणुका महिला बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग निर्माण करून गावातील अनेक ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करते. रेणुकाZohr गावातील दारू, जुगार, मटका, जातीभेद नष्ट करण्यासाठी यशस्वीपणे कार्य करते. त्यातून तिचा आधुनिक दृष्टीकोन दिसून येतो. राजेशची आई पार्वती ने आपल्या निरागस बुद्धीतून गावातला जलसंवर्धनाचा ‘ माती अडवा पाणी जिरवा ’ पहिला प्रयोग यशस्वी करून दाखवते त्यातून पार्वतीचा शास्त्रीय दृष्टीकोन दिसून येतो.
रोजगार हमी योजनेच्या कामात केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊन नौकरी वाचवण्याकरिता तुषार आपली पत्नी आवडी हिला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अभियंता घोंगडेच्या हवाली करतो. आपली अब्रू वाचविण्याकरिता ती धडपडते व घोंगडेच्या डोक्यात मुसळीने वार करून आपली अब्रू वाचविते हा प्रसंग वाचतांना वाचकाच्या अंगावर शहारे उभे राहतात. आवडी गरीब, अडाणी असली तरीही तिला आपली अब्रू महत्वाची असून हा प्रसंग आजच्या मुल्यहीन समाजाला दिशा देणारा ठरतो. स्त्रियांचा सन्मान, समान वागणूक हे मूल्य या कादंबरीचे एक महत्वपूर्ण अंग आहे. समाजविकासामध्ये जर स्त्रियांनी सहभाग घेतला तर कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासाला गती प्राप्त होते, व सामाविकासामध्ये स्त्रियांचे किती महत्व आहे याचे रेखाटन लेखकाने उत्कृष्ट रीतींनी केलेला आहे. याची प्रचीती आपनास उत्तमरीत्या कादंबरीतील स्त्री व्यक्तीरेखांतून दिसून येते.
राजेश नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतो आर्थिक अडचण असल्यामुळे तो त्याची बहिण सोनुला आर्थिक मदत मागतो. सोनू प्रेमाने त्याला मदत करते आणि त्या मदतीच्या सहाय्याने राजेशने हरित क्रांतीच्या दिशेने पाऊले टाकून आधुनिक शेतकरी बनतो. ताईने केलेली मदत परत करण्याकरिता राजेश तिच्याकरिता साडी व जीजुकरिता धोतर घेऊन जातो. हा प्रसंग वाचकाच्या मनाला हळवा करून डोळ्यात अश्रू आणतो. असे अनेक प्रसंग या कादंबरीमध्ये वाचायला आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणाऱ्या आहेत. दारूच्या व्यसनापोटी उध्वस्त झालेल्या तुषारला राजेश मदत करतो आपल्या घरी आणून त्याला जेवू घालतो, त्याला दवाखान्यात नेऊन त्याची शुश्रुषा करतो व पुन्हा त्याला चांगल्या मार्गी लावतो, त्याच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसवतो. अश्या प्रकारे राजेश आणि तुषार आयुष्यभर एकमेकांचे मित्र बनून एकमेकांना सहाय्य करत असतात. अश्या अनेक प्रसंगातून नातेसंबंधाचे महत्व कादंबरीच्या माध्यमातून मांडलेले आहे. मानवाच्या विकासामध्ये पती-पत्नी, नातेवाईक, भाऊ, बहिण, आई, वडील, मित्र आणि समाज यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. कुटुंबामध्ये एकमेकांना समजून घेणे, चांगल्या विचारांची देवाणघेवाण करून एकमेकांना समजून घेऊन प्रोत्साहन देणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासोबतच कुटुंब मित्र यांच्यामाध्ये सकारात्मक संवाद असने फार गरजेचे आहे. म्हणूनच लेखक म्हणतात “नाती ही मानवी जीवनातील अपरिहार्य अशी गरज आहे जीवनात गोडवा निर्माण करावयाचा असेल तर नाती जपली पाहिजे.” लेखकाने नातेसंबंधाचे अतिशय सुंदर वर्णन करून नातेसंबंधाकडे पाहण्याची वेगळी दुष्टी वाचकास दिली आहे. परंतु आजच्या पिढीमध्ये हे संवाद संपलेले दिसून येतात. ही एक शोकांतिकाच लेखकाने कादंबरीच्या माध्यमातून समाजापुढे व्यक्त केलेली आहे. समाजहित साधावयाचे असेल तर समाजात पसरलेली घाण नष्ट करणे अतिशय गरजेचे आहे.
आजच्या समाज व्यवस्थेला भ्रष्टाचाराची किड लागलेली असून कादंबरीमधून या भ्रष्टाचारामुळे एक प्रामाणिक, व्यक्ती कसा पिळल्या जातो, त्याची जीवन जगतांना कशी कुचंबना होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे शंकरराव होय. रोजगार हमी योजनेच्या माधमातून गावात पैसा येतो, कामावर न जाताही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मजुरांना पैसा मिळत असतो. यामुळे जुगार, दारू, चंगळवादाने गावात शिरकाव होतो. आपल्याच अधिकाराचे पैसे मिळण्याकरिता कारकून बक्षीस स्वरुपात दोनशे रुपयाची लाच मागतो, ग्रेडर साहेब, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ दोडके साहेब, अश्या अनेक भ्रष्टाचाराच्या घटना या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने मांडलेल्या आहेत. या भ्रष्टाचाराच्या प्रथेला साथ न देता शंकररावांना आपल्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करून प्रवाहाच्या विरोधात आपले काम करून घ्यावे लागते. म्हणूनच लेखक म्हणतात, “माणुसकीची जागा आता पैश्याने घेतली आहे, आणि हळूहळू g§ñHw$VrhrZ समाज जन्माला येत आहे आणि मानवी मूल्य लयाला जात आहे.” ग्रामपंचायत, पंचायत समिती , आमदार , ग्रामसेवक, कार्यकर्ते, अधिकारी व तुषार यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार फोफावतो त्यामुळे भ्रष्टाचाराला प्रगती म्हणाव की मानवी मूल्याची अधोगती हा प्रश्न मांडला आहे. शंकरराव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालता चालता थकतात.
आज समाजाची स्थिती उत्तम चाकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती अशी झाली असून शेतकरी अलीकडे दयेचा पात्र ठरला आहे. शेतकरी आत्महत्या हा केवळ वायफळ चर्चेचा विषय झाला असून त्यांच्या आत्महत्या रोखल्याच पाहिजे या विषयावर निवडणूक जिंकून सत्ता मिळवायची, व सत्तेत आल्यानंतर मात्र या विषयावर काहीही करायचे नाही असे तंत्र वापरल्या जात आहे. या भ्रष्टाचारामुळे “जगाचा पोशिंदा शेतकरी असला तरी, स्वतंत्र भारतात त्यांच्या कणग्या रिकाम्या आहेत कुटुंबाचे पोट भरण्याकरिता त्याला मजुराकडून धान्य विकत घ्यावे लागत आहे हा एक मोठा विनोदच आहे.” हे दु:ख लेखक कादंबरीतून मांडतात.
समाजामध्ये कितीही नकारात्मक शक्ती असल्या तरीही सकारात्मक शक्तीपुढे त्यांचा निभाव लागत नाही हे कादंबरीचा नायक राजेशच्या कृतीमधून दिसून येते. राजेशचे कुटुंब ज्या व्यवस्थेला बळी पडले होते त्याचाच आधार घेऊन H¥$fr अधिकारी कदम साहेबासारख्या काही प्रामाणिक अधिकाऱ्याची त्याला मदत मिळते त्यामुळे तो प्रगती करतो. तो अतिशय धडाडीने त्याच्या कार्याला सुरुवात करतो. पाणलोट विकास कार्यक्रम, जुन्या फळबागाचे पुनरुज्जीवन व उत्पादकता वाढविणे, अश्या अनेक शासकीय योजनांचा फायदा घेत आपली प्रगती करायला सुरुवात करतो व त्यामध्ये यशस्वी होतो. त्याने केलेल्या आधुनिक शेतीचे प्रयोग बघण्याकरिता अनेक लोक त्याच्याकडे येऊन त्याचे मार्गदर्शन घेतात. सेंद्रिय खतांचा उपयोग करून रासायनिक खतांच्या तुलनेत जास्त उत्पन्न घेतो. शेतकऱ्यांच्या मुलाने वाजतगाजत व हुंडा न घेता रजिस्टर पद्धतीने लग्न करून रेनुकाला आपल्या घरी आणून एक वेगळा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला.
राजेशने दारिद्र्य रेषेखाली जगत असलेल्या अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दुभत्या गाई मिळवून दिल्या. राजेशची पत्नी रेणुकाही त्याला त्याच्या कार्यामध्ये सहकार्य करत होती. रेणुकाने महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून समूहिक शेती, बकरी पालन, कपिला डेअरी असे अनेक छोटे उद्योग सुरु करून राजेश व रेणूकाच्या माध्यमातून एक समृद्ध खेडे उभे राहत होते. पारधी समाजाचे पुनरुज्जीवन करण्याकरिता शासनाने त्यांना दिलेल्या गाई चारा व पाण्याच्या अभावी मरण पावतात पशूंच्या प्रेमापोटी राजेश त्या गाईंना आपल्या घरी आणून जीवदान देतो. गावामध्ये व्यसनमुक्तीचा उपक्रम राबवून गावातील व्यसनाधीन तरुणांना योग्य मार्गी लावतो. असे अनेक समाजोपयोगी कामे करून राजेश समाजापुढे एक आदर्श निर्माण करतो व आपली आणि आपल्या गावाची प्रगती करतो. त्याने केलेल्या समाजोपयोगी कार्यामुळे तो यशवंताच्या सहकार्याने जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतो. पुढे यशवंताच्याच सहकार्याने कोणत्याही राजकीय पक्षाची साथ नसतांना राजेशची जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होते.
विकासाची परिकल्पनाच मुळात आपल्या लक्षात न आल्यामुळे आपली गल्लत झालेली दिसून येते. लेखकांच्या मते अपण “भौतिक प्रगतीलाच विकास समजण्याची गल्लत आपण आज करत आहोत. विकासाचा संबंध माणसाच्या केवळ भौतिक गरजाशी निगडीत नसून तो मानवी जीवनाच्या सामाजिक स्थितीच्या सुधारनेशी आहे. अर्थात विकास म्हणजे केवळ आर्थिक वृद्धी नसून तो माणसाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक स्थितीमधील सकारत्मक परिवर्तन होय. विकासाची ही व्याख्या आजच्या पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधीना न कळल्यामुळे समाजात त्याचे नकारात्मक बदल दिसत आहेत, जे मानवी विकासाला घातक ठरत आहे.”
आजच्या समाजाला, परिस्थितीला सुद्धा अश्याच राजेशची गरज आहे जो गावकऱ्यांना आपल्या अधिकाराची जाणीव निर्माण करून देतो. नायक माणुसकीच्या ईमारतीचा बांधकाम करणारा शिल्पकार असून असेच ध्येय वेडे तरूणंच देशाचा सर्वांगीण विकास करू शकतात. समुद्ध जीवन जगायचं असेल तर पैसा हे उधिष्ट असायला नको. गरीबीचे जीवन जगताना प्रामाणिकपणा, स्वाभिमान, सामाजिक भान असणारा नायक शेती व्यवसाय स्वीकारून गावाचा विकास हाच राष्ट्राचा विकास अस समजणारा एक अउत्या प्रामाणिकपणे देशाची सेवा करतो. जो सुशिक्षित आहे, शेतकऱ्याचे प्रश्न ज्याला माहित आहे, ज्याला शेतकऱ्याच्या जीवनाची जाणीव आहे, त्यावर उपाय शोधून शेतकऱ्यांसाठी योजना तयार करणारा नेताच भविष्यात कोणत्याही अउत्याने निराशेतून आत्महत्या करू नये याकडे एक राजेशच्या स्वरुपात एक अउत्याच लक्ष केंद्रित करणार होता.
आज समाजामध्ये राजेश सारखीच उमेद असलेले अनेक तरुण आहेत. जर शेतीविषयक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतीला व्यावसायिक दृष्टीने पहिले तर आजची बेरोजगारीची समूळ उच्चाटन करता येवू शकते हा संदेश कादंबरीद्वारे लेखाकाने तरुणांना दिलेला आहे. लेखकाने कादंबरीतील २७ प्रकरणे व २१ चित्रांच्या माध्यमातून ३५२ पानांची कादंबरी साकारलेली असुन कादंबरीतील टापटिपपणा, मजबूत बांधणी, व मुखपृष्ठ या प्रकाशकका कडील विशेष गुणांमुळे ही कादंबरी अधिक खुलली आहे.
लेखकाने ही सत्य घटनेवर आधारित कादंबरीतील सर्व पात्र व घटना अश्या रचल्या की प्रत्येक पात्रात व घटनेत आपल्या जवळच कुणीतरी दिसत व वाचकच नायक झाल्याचं जाणवतं. गावकरी, कौटुंबिक, सामाजिक व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग, नातेसंबंध इ. विषय हळूवारपणे त्यांनी कादंबरीच्या माध्यमातून मांडले आहेत. कादंबरीमधून समाजातील खूप चांगल्या आणि वास्तववादी विचारला स्पर्श केला आहे. लेखक मा.शेषरावजी खाडे साहेबांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!
- लेखक : शेषरावजी खाडे
- डॉ. रविकांत महिंदकर
- समीक्षक, ग्रंथपाल
- श्री. आर.आर.लाहोटी विज्ञान महाविदयालय मोर्शी
- अध्यक्ष, वाचाल तर वाचाल बहुउदेशीय संस्था, अमरावती
- ८०८७९४१०६२