हिंगणघाट : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात अकितावर उपचार करणारे ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूरचे डॉ. निनाद गावडे, आशाताई कुणावर महाविद्यालयातील प्राध्यापिका मोनिका माउसकर व विद्यार्थी वैष्णवी चंदनखेडे या साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली. त्याचप्रमाणे बुधवारी काही साक्षीदार तपासण्यात येईल, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्यासमोर सुरू झाले. हे कामकाज दुपारी दोन वाजेपयर्ंत चालले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील अँड. वैद्य यांनी सहकार्य केले तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024