हिंगणघाट : संपूर्ण राज्यासह देशभरात गाजलेल्या प्राध्यापक अंकिता पिसुद्दे जळीत कांडप्रकरणी सोमवार, १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपयर्ंत येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उरलेल्या साक्षीदारांची साक्ष नोंद करतील. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या सिद्धतेसाठी हे साक्ष पुरावे घेण्यात येत आहेत.
१४ डिसेंबर २0२0 रोजी आरोपी विकेश नगराळेविरुद्ध आरोप ठेवण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम आले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला आपली बाजू ठेवण्यासाठी वकील उभे करावे, असे सांगितले होते. त्यानुसार १७ डिसेंबरला आरोपीकडून नागपूरचे अँड. सोने यांनी आपले वकीलपत्र दाखल केले. त्यानंतर ११, १२, १३ जानेवारी २0२१ रोजी या प्रकरणात सात लोकांचे साक्ष पुरावे घेण्यात आले आहे.
उर्वरित साक्ष पुराव्यासाठी १५ ते १७ फेब्रुवारी या तीन दिवसांत साक्ष नोंद करण्यात येईल. त्यावर काही आक्षेप असल्यास आरोपीच्या वकिलाकडून उलटतपासणी करण्यात येईल. त्यानंतर आरोपीचे बयाण रीतसर न्यायालय घेईल. या प्रक्रियेनंतर दोन्ही पक्षाचे न्यायालयासमोर युक्तिवाद सुरू होईल, अशी एकूण न्यायालीन प्रक्रिया आहे. बुधवार, १0 फेब्रुवारीला अंकिता प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हा विषय परत चर्चेला आला. आता सोमवार ते बुधवारपयर्ंत साक्ष नोंदण्यात येईल.
यासंबंधात येथील सरकारी वकील दीपक वैद्य, वकील सोईतकर हे विशेष सरकारी वकिलांना साहाय्य करीत आहेत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024